Sharib Hashmi Shares Video Of his Shok sabha :  अभिनेता शारिब हाश्मी ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून जेकची भूमिका साकारत घराघरात पोहोचला. शारिबचे आज लाखो चाहते आहेत. त्याला अनेक लोक या भूमिकेसाठी ओळखतात. शारिब हाश्मी हा त्याच्या नावानं नाही तर जेके तलपडे या त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. काही दिवसांनी त्या 'फॅमिली मॅनच्या 3' सीझन विषयी प्रेक्षकांना माहिती दिली होती. दरम्यान, सध्या शारिब हाश्मी हा 'असुर 2' मध्ये दिसत आहे. दरम्यान, शारिबनं नुकताच सोशल मीडियावर त्याच्या शोकसभेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारिब हाश्मीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. शारिब हाश्मीनं शेअर केलेला हा व्हिडीओ 'असुर 2' च्या सेटवरचा आहे. या व्हिडीओत सगळ्यात आधी काही लोक हे शोकसभेत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सेटवरचे अनेक लोक हे सगळ्या गोष्टी नीट आहेत ना हे तपासत आहेत. तर व्हिडीओच्या शेवटी शारिब हाश्मीचा एक फोटो दिसत असून त्यावर हार चढवलेला आहे. हा हार लोलार्कच्या निधनानंतर त्याच्या फोटोवर चढवण्यात आला होता. "लोलार्क की शॉक सभा, विनोद एकीकडे... जेव्हा पासून असूर 2 आला आहे. तुम्ही सगळ्यांनी लोलार्कवर जो विश्वास दाखवला आणि प्रेम दिलं त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद", असे कॅप्शन शारिबनं या व्हिडीओला शेअर करत दिले आहे. शारिबनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'मेरा दिल ये पुकारे' फेम पाकिस्तानी तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, तरुणांना लावलं वेड


दरम्यान, शारिब हाश्मीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'जब तक है जान, ', 'स्कॅम 1992', 'मिशन मजनू', 'द ग्रेट इंडियन मर्डर' या सारखे अनेक चित्रपट आहेत. 'द फॅमिली मॅन'मध्ये तो जेके तळपदेच्या भूमिकेत दिसला होता. शोचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज बाजपेयी यांनी आधीच फायनॅनशिअल अॅस्पेक्टवर चर्चा केली आहे. तर शारिबनं ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शारिबनं सांगितलं आहे की "मी पैशांविषयी चर्चा केली नाही. मी फक्त तारखांवर चर्चा केली आहे. तर तिसऱ्या सीझनच्या चित्रीकरणासाठी सेटवर येण्यासाठी मी उत्सुक आहे." शारिबला पुन्हा एकदा जेके तळपदेच्या भूमिकेत पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आणि 'द फॅमिली मॅन 2' चे चाहते उत्सुक आहेत.