मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शशांक केतकरने गेल्या वर्षी ४ डिसेंबरला प्रियंका ढवळे हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर शशांक आपल्या शेड्युल्डमध्ये प्रचंड व्यस्त होता. मात्र आता या बिझी शेड्यूल्डमधून शशांकला त्याच्या हनिमूनसाठी वेळ मिळालाय. शशांक आणि प्रियंका हे दोघेही लव्हबर्ड सिंगापूर आणि थायलंडमध्ये हनिमून साजरा करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशांक बऱ्यापैकी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याने इन्स्टाग्रामवर नुकतेच हनिमूनचे काही फोटो शेअर केलेत. सिंगापूरमध्ये हे जोडपे एकमेकांना वेळ देतायत. शशांकने सिंगापूरमधील दोघांचा एक फोटो शेअर केलाय. यात त्याने केवळ ब्लू रंगाचे हार्ट इतकंच कॅप्शन दिलेय. 





झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरची या मालिकेतून शशांक घराघरांत पोहोचला होता. या मालिकेने त्याला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. तो टीव्ही जगता श्री या नावानेच ओळखला जाऊ लागला. शशांकने आधी तेजश्री प्रधान हिच्याशी लग्न केले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शशांकने प्रियंकाशी लग्न केले. प्रियंका पेशाने वकील आहे.