Shashank Ketkar : 2013 साली आलेली मालिका 'होणार सून मी या घरची' ही आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेच्या कलाकारांना या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केले होते. ही मालिका तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती. मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय देखील ही मालिका पाहत होते. श्री आणि जान्हवीची जोडीही प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. त्यातून जान्हवीचं ते तीन पदरी मंगळसूत्र, तिचं 'काहीही हं श्री' म्हणणं, सोबतच व्हॉट्सअॅपवर या मालिकेचे मीम्सही फिरायचे. त्यातून सहा सासवा यांची कथा ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. वेगळ्या वातावरणात वाढलेल्या जान्हवीच्या आयुष्यात जेव्हा श्री येतो तेव्हा तिचे संपुर्ण विश्वच बदलून जाते. त्यातून लग्नानंतर सहाही सासवांची मनं जिंकून घेऊन जान्हवी सगळ्यांनाच एक करून घेते. त्यामुळे ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री आणि जान्हवी यांची लव्हस्टोरीही फार गाजली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका पोडकास्टमधून त्यानं या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या मालिकेला दहा वर्षे पुर्ण झाली आहेत. परंतु आजही ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेमुळे अनेक लोकप्रिय चेहरे परत आपल्या भेटीला आले होते. त्यामुळे या मालिकेचीही चर्चाही बरीच रंगली होती. सध्या चर्चा आहे ती म्हणजे यावेळी शशांकनं सांगितलेल्या काही आठवणींची. त्यानं यातून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तो म्हणाला आहे की, 'काहीही ही श्री' हा डायलॉग नक्की कसा व्हायरल झाला होता. 


हेहा वाचा : A का B? कुठला चेहरा दिसतोय अधिक हसरा; या निरीक्षणावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं


तेव्हा अशी वेळ होती की सोशल मीडिया आजच्या इतका सक्रिय नव्हता. त्यामुळे अनेकांना याबद्दल फारसं माहितीही नव्हतं. पण तरीही ते शब्द इतके लोकप्रिय झाले की प्रत्येक विनोद आणि मीममध्ये हे तीन शब्द असायचे. आम्हीही त्या गोष्टीचा आनंद घेत होतो. अजूनही मला ते मीम दिसलं की हसू येतं. शशांकसोबत या मालिकेत निर्मात्या सुनील भोलाणे देखील होत्या. त्यांनी या मालिकेच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही तेव्हा तो ट्रॅक शूट करत होतो की जान्हवीच्या बाबांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर तो पाहून प्रेक्षक हे सेटवर यायचे आणि तेजश्रीला पैसे द्यायचे. तिच्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन व्हावं यासाठी तिचे चाहते तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही तेव्हा हे पाहून खरंच खूप चकित झालो होतो की या मालिका प्रेक्षकांना या किती आपूलकीच्या वाटतात. 


शशांक या पोडकास्टमध्ये म्हणाला की, आम्ही सगळे एकत्र सेटवर खूप मज्जमस्ती करायचो आणि एकत्र जेवायचो.