Shashank Ketkar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे शशांक केतकरची. 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेतून त्याला फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियत मिळाली होती. त्याच्या मालिकांची तेव्हाही प्रचंड चर्चा रंगलेली होती. त्याचसोबत त्याची सध्याही चर्चा सुरू असते. आताही तो मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे. त्यातून त्याची सर्वाधिक चर्चा रंगली होती म्हणजे 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेमुळे. शशांकनं वेबसिरिज, नाटकं, मराठी चित्रपट आणि मालिका यांच्यातूनही कामं केली आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता अफाट आहे. त्याला जास्त करून आपण सर्वांनी टेलिव्हिजनमध्ये जास्त पाहिलं आहे. त्यामुळे त्याची सर्वत्रच चर्चा होताना दिसते. सोबतच त्यावर टेलिव्हिजन माध्यमावरील आपलं प्रेम अनेकदा व्यक्तही केलं आहे. सध्या त्यानं नुकत्याच एका मुलाखतीतून आपल्या टेलिव्हिजनवरील प्रेमाविषयी भाष्य केले आहे आणि अनेक खुलासेही केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शशांकनं सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यानं अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मालिकांमध्ये कपड्यांसाठी, जेवणासाठी, शिफ्टसाठी झगडावं लागत असताना तू टीव्हीवर कसा रमतोस? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं उत्तर दिलं आहे. या मुलाखतीदरम्यान तो म्हणतो की, ''मला टीव्हीवर मालिकांमध्ये काम करायला आवडतं. माझं ते प्रेम आहे. मला हा ताण घेऊन काम करायला आवडतं. त्याबरोबरच मला नीट सर्व व्यवस्थित गोष्टी असतानाही काम करायलाही आवडतं. टीव्हीसोबतच मला चित्रपटातही काम करायला आवडतं. पण आपल्याला चित्रपट सतत मिळतील का? याची मला कसलीही शाश्वती नाही. कारण शशांक केतकरचा चित्रपट 300 रुपयांचं तिकीट काढून लोक का बघतील? त्याच 300 रुपयात त्यांना ऋतिक रोशन दिसतोय'' असं स्पष्ट मतं आपल्याबद्दल त्यानं केलं आहे. 


हेही वाचा - 'पैसा वाया घालवू नकोस, निवृत्त हो...' कंगनाचा करण जोहरला खोचक सल्ला


पुढे तो म्हणाला की, ''दक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी मनोरंजनाचं साधन म्हणून फक्त त्यांचीच भाषा ठेवली आहे. आपल्याला हिंदी पण येतं, इंग्रजीही येतं आणि मराठी येतेच. त्यामुळे आपण निवड करतो. 300 रुपयात एखादा गहन चित्रपट पाहण्यापेक्षा मी वरुण धवनचा एखादा धमाल, टाईमपास असा चित्रपट बघेन. एक प्रेक्षक म्हणून हा विचार लोकांच्या डोक्यात येणं सहाजिक आहे”, असं तो यावेळी म्हणाला आहे त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.


हेही वाचा - 'एवढ्याशा मानधनात घर कसं चालणार?' मराठी टेलिव्हिजन अभिनेता जरा स्पष्टच बोलला



'पाहिलं न मी तुला' या मालिकेतून त्यानं खलनायकाचीही भुमिका केली होती. त्यातून रोमॅण्टिक हिरोच्या भुमिकाही त्याच्या गाजल्या आहेत. त्यामुळे त्याची क्रेझ अद्यापही कायम आहे.