Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर हा आपल्या आवडीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजते आहे. यावेळी त्यानं या मुलाखतीतून अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. यावेळी त्यानं कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तो काय म्हणाला आहे याबद्दल त्यांच्या चाहत्यांचेही लक्ष लागून राहिली आहे. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की टेलिव्हिजनवरील मानधनावर तो नक्की काय म्हणाला आहे. 'होणार सुन मी या घरची' या मालिकेतून तो घराघरात पोहचला होता. त्यामुळे तेव्हा त्याच्या कॅरेक्टरची चांगलीच चर्चा रंगलेली होती. श्री या नावानं तो आजही ओळखला जातो. शशांक केतकरही आजही टेलिव्हिजनवर चांगलाच लोकप्रिय आहे.
नुकतीच त्यानं सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनला मुलाखत दिली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. त्यानं यावेळी चित्रपटसृष्टीतील मानधनाविषयी खुलेपणानं सांगितलं आहे. यावेळी तो म्हणाला की, “होणार सून मी या घरची ही माझी सहावी मालिका होती. मालिकांद्वारे तुम्ही घराघरात पोहोचता. त्यामुळे तुमचा चाहतावर्ग आणि प्रेक्षक वर्ग कितीतरी पटीने वाढत जातो. मालिकेमुळे तुम्हाला महिन्याचे 20 ते 25 दिवस काम मिळणार आहे याची मला खात्री असते.'' असं तो म्हणाला आहे. यापुढे त्यानं टेलिव्हिजनवरील मानधन आणि त्यातून भागवला जाणारा घरखर्च यावर चर्चा केली आहे.
हेही वाचा - 'आतल्या खोलीत जाऊ या असं म्हणाला निर्माता अन्...' मराठी अभिनेत्रीनं सांगितला फेक ऑडिशनचा किस्सा
तो म्हणाला की, ''सर्वच मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे 'पर डे'वर काम करतात. इतके दिवस काम केल्यानंतर इतके हजार हे साधारण गणित डोक्यात असतं. माझी सुरुवात मी 1200 (पर डे) रुपयांपासून केली. आता वाढता वाढता वाढे ते एका ठराविक मानधनापर्यंत मी आलो आहे. त्यावेळीच्या मानधनाचाही मला आदर होता. पण त्या मानधनात अर्थात घर चालत नव्हतं. आता अर्थात घर आणि EMI हे सर्व चालवू शकतो”, असं तो स्पष्टपणे म्हणाला आहे.
हेही वाचा - '300 रूपयात लोकं मला पाहण्यापेक्षा...' शशांक केतकर असं का म्हणाला, काय आहे त्याच्या मनात?
मध्यंतरी बड्या निर्मात्यांकडून टेलिव्हिजन कलाकारांचे पैसे थकवल्याबद्दल कलाकारांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे टेलिव्हिजन आणि मानधन असा आणि त्यावरून न भागवता येणारा घर खर्च याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा रंगलेली होती. लॉकडाऊनमध्येही अनेक कलाकारांना याचा त्रास सहन करावा लागला होता.