'पैसा वाया घालवू नकोस, निवृत्त हो...' कंगनाचा करण जोहरला खोचक सल्ला

Kangana Ranaut on Karan Johar: करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेव्हा सध्या या चित्रपटाबद्दल सर्वच सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. यावेळी कंगना राणावतही यावरून करण जोहरवर टीका केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 29, 2023, 06:20 PM IST
'पैसा वाया घालवू नकोस, निवृत्त हो...' कंगनाचा करण जोहरला खोचक सल्ला title=
July 29, 2023 | kangana ranaut shares an angry note on karan johar says dont waste money

Kangana Ranaut on Karan Johar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची. सध्या या चित्रपटावरून पुन्हा एकदा वादंग सुरू झाला आहे. एक म्हणजे या चित्रपटात धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझामी यांचा एक किसिंग सीन आहे. त्यावर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता अभिनेत्री कंगना राणावतनं करन जोहरवर पुन्हा एकदा टीकास्त्र टाकलं आहे. त्यामुळे सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी गाजतो आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भुमिका आहे. सोबतच शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांचीही मुख्य भुमिका आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटातून काहीतरी हटके आणि वेगळं पाहायला मिळणार आहे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून या चित्रपटाचा टीझर आल्यानंतर तर या चित्रपटाची उत्सुकताही लागून राहीली होती. सोबतच ट्रेलरही तूफान गाजला होता. 

परंतु आता या चित्रपटावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातून कंगनाची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिनं यावेळी करण जोहरवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यापुर्वीही तिनं करण जोहरवर टीकास्त्र सोडले होते आता पुन्हा एकदा तिनं याबद्दल करण जोहरवर टीका केली आहे. यावेळी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटावरून तिनं हे टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे हे जाणून घेऊया.

तिनं इन्टाग्रामवरती एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिनं म्हटलंय की, ''येथे भारतीय प्रेक्षक अण्वस्त्र निर्मिती आणि अणुविज्ञानावर आधारित 3 तासांचा चित्रपट पाहत आहेत तर दुसरीकडे नेपोटिझम गँगची तीच सासू आणि सून रडगाण्याची कथा समोर येते आहे. पण याची खरंच गरज आहे का? अशा चित्रपटांसाठी 250 कोटींची गरज का आहे? करण जोहर तुला लाज वाटली पाहिजे की तू एकसारखाच तोच तोच विषय घेऊन चित्रपट कित्येकदा बनवत आहे. तू स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणतोस. पैसे वाया घालवू नको. हा चित्रपटसृष्टीसाठी कठीण काळ आहे. निवृत्त हो आणि नवीन चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना आता येऊ दे जे नवीन आणि चांगले चित्रपट बनवतील.''

हेही वाचा - 'बाईपण भारी देवा' Real Life Story? लेखिकेनचं केलं त्या 'भारी बायां'बद्दलचा खुलासा

माझा सल्ला आहे की रणवीरने करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्सकडून प्रभावित होऊ नये. त्याने सामान्य माणसासारखे कपडे घालावेत जसे त्यांच्या काळात धरमजी आणि विनोद खन्ना घालायचे. भारतीय लोक स्वतःला हिरो म्हणवणाऱ्या, कार्टून दिसणाऱ्या माणसाला ओळखत नाहीत तेव्हा प्लीज साऊथच्या सर्व हिरोंना पाहा की ते कसे कपडे घालतात आणि स्वतःला कॅरी करतात.