``पेंग्विनची गरज काय?`` शशांक केतकरनं पोस्ट केलेला बस स्टॉपवरील `तो` फोटो का होतोय व्हायरल...
Shashak Ketkar Bus Stop Photo: शशांक केतकर आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असतो. त्यातून आता सध्या त्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात तुम्हालाही तोच प्रश्न पडेल जो शशांकला पडला आहे.
Shashak Ketkar Bus Stop Photo: शंशाक केतकर हा आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेचे सर्वच जण चाहते आहेत. 10 वर्षांपुर्वी आलेल्या या मालिकेनं इतिहास घडवला होता. आजही ही मालिका तितकीच पॉप्यूलर आहे. त्यामुळे या मालिकेची आजही चर्चा होताना दिसते. शशांक केतकरचीही त्यामुळे चांगलीच चर्चा रंगलेली असते. श्री म्हणून त्याची ओळख आजही कायम आहे. शशांक हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये त्यानं पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो काहीतरी गमतीदार म्हणताना दिसतो आहे. त्यामुळे त्याची या पोस्टमुळे चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. तुम्हालाही या पोस्टमध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली असेलच.
तुम्हाला 'होणार सुन मी या घरची' या मालिकेतून बसस्टॉपवाली लव्हस्टोरी चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे बसस्टॉप हा प्रकार चांगलाच चर्चेत होता. आता बसस्टॉप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातून आता त्याची एक पोस्ट चर्चेत आहे. ज्यात त्यानं बसस्टॉपवरील एक फोटो पोस्ट केला आहे. जिथे तुम्ही पाहू शकता की पेग्विंन दिसत आहे. जे एका लाईनत दिसत आहेत. त्यामुळे त्याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता तुम्ही म्हणाल की नक्की यात असं काय चर्चेत आहे. परंतु त्यानं लिहिलं कॅप्शन हे खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणाला आहे की, ''आता मला खरं खरं सांगा… bus stop वर रांगेत चला हे सांगण्यासाठी penguin वापरायची काय गरज होती''
हेही वाचा - जेजुरीला गेलेल्या पाठकबाईंच्या साडीची चर्चा; कारणही आहे तसं फारच खास
#smart #witty #politics #maharashtra असे हॅशटॅग्सही वापरले आहेत. त्याच्या या फोटोखाली अनेकांंच्या कमेंट्सही आल्या आहेत. सोबतच यावेळी अनेकांनी गंमतीदार कमेंट्सही केल्या आहेत. ''एकानं लिहिलंय की, कारण, आबा ऐकणार नाहीत.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, कारण आजकाल लोकांना शिस्तीत राहायला शिकवायची खूप गरज आहे... आता तर माणसांना प्राण्यांकडून शिकण्याची गरज आहे... मग ते मुंगी असो किंवा पेंग्विन...'' तर तिसऱ्या एकानं लिहिलंय की, आत्ताच्या काळात हे खूप आवश्यक आहे. कारण त्यांना सरळ व्यवस्थित चढता येत नाही. त्यामुळे त्यांना याची खूप गरज आहे.''
सध्या त्यांचा ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. मालिकांसोबतच त्यानं मराठी नाटकं, चित्रपट आणि वेबसिरिजमधूनही कामं केली आहेत.