मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 26 दिवसांनंतर तूरूंगातून बाहेर आला आहे. मुलगा ड्रग्स प्रकरणार अडकल्यामुळे शाहरुख तुफान चर्चेत आला. या प्रकरणादरम्यान अनेक बॉलिवूडकर शाहरूखच्या मदतीसाठी आणि आर्यनच्या समर्थनार्थ आले. तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी आर्यनच्या विरोधात उभे राहिले. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी याविषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिन्हा यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत शत्रुध्न सिन्हा म्हणाले, 'मी तंबाखूविरोधी अभियान करतो. मी नेहमी ड्रग्जला नाही म्हणतो आणि तंबाखूवर बंदी घालतो. आज मी स्वतःला नशिबवान समजतो माझी तिन्ही मुलं लव, कुश आणि मुलगी सोनाक्षी या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. मला माझ्या मुलांवर गर्व आहे. माझ्या मुलांवर मी चांगले संस्कार केले आहेत असं अभिमानाने सांगू शकतो...'



पुढे सिन्हा म्हणाले, 'मी कधी माझ्या मुलांना असं काही करताना पाहिलं नाही, ऐकलं नाही. ही आई-वडिलांची जबाबदारी आहे की मुलांवर लक्ष ठेवायला हवं. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुलांना वेळ द्यायला हवा. पालकांनी आपल्या मुलांसोबत बसून जेवण करावे. त्याचबरोबर आर्यनला केवळ शाहरुखचा मुलगा आहे म्हणून माफ करू नये, तर केवळ या प्रकरणावरून त्याला टार्गेट करू नये, असेही ते म्हणाले.