करायला गेले एक आणि झालं भलतंच... शत्रुघ्न सिन्हा झाले ट्रोल!
बोलायचं होतं भलतंच आणि बोलून गेलो भलतंच... असं तुमच्याही बाबतीत कधी झालं असेल... असाच एक प्रसंग ज्येष्ठ अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाबतीत घडलाय... आणि तोही सोशल मीडियावर... आणि त्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा ट्रोल झाले नाहीत तरच नवल...
मुंबई : बोलायचं होतं भलतंच आणि बोलून गेलो भलतंच... असं तुमच्याही बाबतीत कधी झालं असेल... असाच एक प्रसंग ज्येष्ठ अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाबतीत घडलाय... आणि तोही सोशल मीडियावर... आणि त्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा ट्रोल झाले नाहीत तरच नवल...
त्याचं झालं असं की, शत्रुघ्न सिन्हा यांना ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या... त्यांनी त्या ट्विटरवरून शब्दांत व्यक्तही केल्या... पण, या ट्विटसोबत शेअर केलेल्या फोटोत मात्र त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर केलाय.
'महान अभिनेते, एन्टरटेनर आणि संवाद लेखक कादर खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... वाढदिवसाच्या शुभेच्छा!' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पण, वर दिसणाऱ्या फोटोत मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अमिताभ बच्चन दिसत आहेत.
त्यानंतर, शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एक ट्विट करत आपण आणि अमितजींनी एकत्र काम केल्याचं म्हटलंय.