मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी गुपचूप लग्न केलं. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रिती झिंटा. या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळ्याच प्रकारची भूरळ घातली होती. वीर-झारा’, ‘सलाम-नमस्ते’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. प्रिती रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी आजही तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिनेत्री प्रिती तिच्या करियरमुळे नाही तर तिच्या स्वभावामुळे चर्चेत आली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, प्रितीने एक दोन नाही तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 34 मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय प्रितीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला. 2009 साली त्यांनी ऋषिकेशमधून 34 अनाथ मुलींना दत्तक घेतलं आहे. 



एवढंच नाही तर वर्षातून दोनवेळा तरी त्या 34 मुलींना भेटायला जाते. प्रितीचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे. प्रितीच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं ती 'भइया जी सुपरहिट' चित्रपटात दिसली. शिवाय आयपीएल दरम्यान ती कायम तिची क्रिकेट टीम किंग्स इलेवन पंजाबचा उत्साह वाढवताना दिसते. 


प्रिती सध्या तिचं खासगी जीवन एन्जॉय करत आहे. प्रितीने 2016 साली जीन गुडइनफसोबत लग्न केलं. हे लग्न अतिशय गुपचूप झालं. लग्नाचे फोटो 6 वर्षांनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले.