Shefali Jariwala : 'काटा लगा...' या म्यूझिक अल्बममुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. सोशल मीडियावर (shefali jariwala instagram) कायम सक्रिय असणारी शेफाली 'रात्री के यात्री' या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. शेफालीने सीरिजचं पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. शेफाली सीरिजमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलेच्या भूमीकेत दिसणार आहे. देह विक्री करणाऱ्या महिलांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीने प्रचंड मेहनत घेतली आहे. सीरिजमध्या भूमिका खरी वाटावी म्हणून शेफाली देह विक्री करणाऱ्या महिलांना देखील भेटली. (shefali jariwala movies and tv shows)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मी याआधी देह विक्री करणाऱ्या महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहायची. त्यांच्याबद्दल माझे विचार पूर्ण वेगळे होते. त्यांचं काम वाईट आहे, त्या ज्या ठिकाणी राहतात त्यांची वस्ती फार घाण आहे. असे विचार कायम माझ्या मनात असायचे. आपल्या समाजाने त्या महिलांना पूर्ण पणे वाळीत टाकलं आहे.' (shefali jariwala husband)



अभिनेत्री पुढे म्हणाली, 'आपण या गोष्टीचा कधीच विचार नसेल केला की या महिला असं काम का करतात. जेव्हा मी त्यांच्यासोबत राहिले. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं तेव्हा देह विक्री करणाऱ्या महिलांबद्दल माझा मनात जे विचार होते ते पूर्णपणे बदलले.' (shefali jariwala age)


'मी जेवढे क्षण त्यांच्यासोबत व्यतीत केले, ते प्रचंड दुखःद होते. त्यांची पडती बाजू मला कळाली.' असं देखील अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री देह विक्री करणाऱ्या महिलांना पैसे देखील दिले. ‘रात्री की यात्री’ एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित करण्यात आली आहे. (shefali jariwala net worth)