नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शहा हिने बिग बी यांना एक विशेष पेंटींग भेट दिली आहे. या दोघांनी 'द लास्ट लियर', 'वक्त : द रेस अगेंस्ट टाइम' आणि 'मोहब्बतें' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ही भेट तिने बिग बींच्या वाढदिवसानिमित्त दिली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शेफाली म्हणते, "एक अशी व्यक्ती की जिला ओळखणे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. एक अशी व्यक्ती जिचा मी खूप आदर करते आणि त्यांच्यावर खूप प्रेम करते. मी आशा करते की, अमितजींना ही भेट खूप आवडेल."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बींना दिलेल्या खास भेटीबद्दल शेफाली म्हणते, "ही पेंटींग 'वन इन मिलियन' नावाच्या श्रृंखलेवर आधारित आहे आणि ही पेंटींग मी अमितजीं शिवाय कोणालाही देण्याचा विचारच नाही करू शकतं."



अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला होता. मात्र यंदा त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. सध्या 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत असलेले बिग बी लवकरच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात दिसून येतील. याव्यतिरिक्त ते ऋषि कपूर  सोबत '१२० नॉट आऊट" मध्ये देखील झळकणार आहेत.