मुंबई: अभिनेत्रीनं अभिनेत्री अनिता हसनंदानीने दुसऱ्या चिमुकल्याच्या तयारीचा विचार करत असल्याची चर्चा असतानाच आता आणखीन एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोनं चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 13 फेम शहनाझ गिलचे सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. बादशाहच्या म्युझिक व्हिडीओनंतर शहनाज आता दिलजित दोसांझ यांच्या आगामी 'हौंसला रख' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटमधील काही छायाचित्रे आता शहनाज गिलने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.



चाहत्यांची प्रतिक्रिया



या पोस्टमध्ये शहनाझ या फोटोमध्ये फ्लोलर ड्रेसमध्ये खूप आनंदात दिसत आहे. तर दिलजीत पांढऱ्या सूटमध्ये तिच्याकडे पाहात असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये शहनाझ बेबी बंप करत असल्याचं समोर आलं आहे. शहनाझने हा फोटो शेअर करत उत्सुकता? असं कॅप्शन दिलं आहे. तर बॅगराऊंडला तान्ह्या बाळासाठी लागणाऱ्या गोष्टींची सजावट असल्यानं सोशल मीडियावर या फोटोमुळे खूप चर्चा सुरू झाली आहे.