Shehnaaz Gill On Marriage : 'देसी वाईब्स विद शेहनाज गिल'  (desi vibes with shehnaaz gill) हा शो सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे . मागील काही दिवसांपासून हा शो चांगलाच हिट होतं आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या शोला हजेरी लावली आहे, मग त्यात शाहिद कपूर (shahid kapoor) , आयुष्मान खुराणा (aayushman khurana), विकी कौशल (vicky kaushal) या सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. (shehnaaz gill big statement on marriage)
या शोमध्ये शेहनाज येणाऱ्या पाहुण्यांना काही प्रश्न विचारते आणि मस्त हसत खेळत मुलाखतीचा हा शो प्रेक्षकांना खूप आवडू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच या शोमध्ये फेमस युट्युबर भुवन बाम (bhuvan bam) याने हजेरी लावली होती. यावेळी शेहनाजने त्याला खासगी आणि व्यायवसायिक आयुष्याविषयी बरेच प्रश्न विचारले. त्यांनतर भुवन ने शेहनाजला सुद्धा लग्नाविषयी बरेच प्रश्न आणि भविष्यातील प्लॅनविषयी विचारलं . (shehnaaz gill big statement on marriage)


यावेळी शेहनाजने तिच्या खाजगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. सिद्धार्थ शुक्ल आणि शेहनाज गिल यांची लव्हस्टोरी सर्वानाच माहित आहे . बिग बॉस 13 सीझनमध्ये दोघांची मैत्री झाली आणि त्याच रूपांतर प्रेमात झालं. शेहनाज आणि सिद्धार्थची जोडी सगळ्यांना खूप आवडू लागली होती. दोघांना अक्षरशः सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. (sidharth shukla, shehnaaz gill lovestory )


दोघे लग्न करणार अशा अनेक चर्चा होत्या, पण नियतीला फार वेगळंच मान्य होतं 2 सप्टेंबर 2021 रोजी हार्ट अटॅकमुले सिद्धार्थचं निधन (sidharth shukla heart attack death ) झालं . यानंत मात्र शेहनाज खूपच खचली होती. तिने सगळ्यांना भेटणं बोलणं सर्वकाही बंद केलं होतं, पण त्यानंतर तिने स्वतःला सावरलं आणि या सर्वातून बाहेर आली आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. 



लग्नाविषयी बोलताना शेहनाज म्हणते, 'तिला आता लग्न आणि संसार यावर विश्वास राहिला नाहीये तिला इतके पैसे कमवायचे आहेत कि आयुश्यात पैशांसाठी कोणाहीपुढे तिला हात पसरायचे  नाहीयेत. यासाठी आजन्म कुमारी राहण्याससुद्धा ती तयार असल्याचं म्हणते . '' 


शेहनाजच्या वॉर्कफ्रॉन्टविषयी बोलायचं तर अलीकडेच तिने सलमान खानच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे, 'किसी का भाई किसकी जान' (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमात ती दिसणार आहे,



शिवाय  नुकतेच शेहनाजने स्वतःच नवीन घर खरेदी केलं आहे.