Shehnaaz Gill: शहनाज गिलकडून रिलेशनशिपच्या चर्चांवर सडेतोड उत्तर
शेहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : Bigg Boss 13 या रिअॅलिटी शोमधून प्रकारझो तात आलेल्या आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचे (shehnaaz gill) लाखो चाहते आहेत. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्यासोबत असणारी तिची मैत्री ही सगळ्यांनाच आवडायची. त्याच्या निधनानंतर शहनाजच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. पण, आता मात्र ती या अडचणींवर मात करुन पुढे चालताना दिसत आहे. दरम्यान, शहनाज ही सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहेत. दरम्यान, शहनाजनं यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : ना गाजावाजा, ना भरमसाट मेकअप; ठसठशीत नथीचा श्रृंगार करत मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
सूत्रांच्या माहितीनुसार शहनाज सध्या सेलिब्रिटी होस्ट आणि डान्सर, राघव जुयालसोबत (Raghav Juyal) रिलेशनशिपमध्ये आहे. योग्यवेळ येईपर्यंत ते त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगणार नाहीत असे म्हटले जात आहे. नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी प्रश्न विचारता शहनाजनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Shehnaaz Gill Break Silence On Dating Rumours With Raghav Juyal Watch Video)
आणखी वाचा : मलायका अरोराच्या Superbold लूकवरून अर्जुन कपूचीही नजर हटेना, पाहा Photo
शहनाज या व्हिडीओमध्ये बोलते की, मीडिया खोटं का बोलते? मीडिया प्रत्येक वेळी खोटं बोलते. दरम्यान, एका पत्रकारानं शहनाजला विचारलं की, आजकाल तू रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे, यावरून तू बोलत आहेत का की मीडिया खोटं बोलते. यावर संतप्त प्रतिक्रिया देत शहनाज बोलते मीडिया काहीही बोलते.
आणखी वाचा : Good News नंतर बिपाशाच्या पतीवर का संतापले नेटकरी? अभिनेत्याच्या Attitude वर जळजळीत टीका
शहनाज लगेच एका पत्रकाराला प्रश्न विचारते की, जर तुम्ही त्यांच्यासोबत उभे आहात, तर तुम्ही त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहात का? यावर ती 'नाही' असे उत्तर देते. हे ऐकून शहनाज बोलते, 'मग... मग आम्ही कोणासोबत उभे आहोत, किंवा एखाद्यासोबत हँग आउट करत आहे तर आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत का?
आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल
काही दिवसांपूर्वीच त्यांना विमानतळावरही एकत्र पाहिलं गेलं होतं. राघव आणि शहनाज एका ठिकाणी पिकनीकसाठी गेले होते असंही त्यावेळी म्हटलं गेलं होतं. त्याव्यतिरिक्त त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शहनाज गिल आणि राघव जुयाल दोघेही सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात काम करत आहेत.