मुंबई : पंबाजची कतरिना म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शहनाज. बिग बॉसनंतर शहनाजच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात शहनाजला खरं प्रेम तर मिळालं, पण त्या प्रेमाने शहनाजची अर्ध्यावर साथ सोडली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं आणि साध्या, खोडकळ स्वभावामुळे शहनाज कायम चाहत्यांच्या मनात राहिली. एवढंच नाही तर, सिद्धार्थ आणि शहनाजच्या लग्नाच्या चर्चांनी देखील चाहत्यांमध्ये जोर धरला. .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ आणि शहनाजची लव्हस्टोरी तर संपूर्ण देशाला माहिती आहे. पण फार कमी लोकांना माहित असेल की, जर शहनाजच्या आयुष्यात सिद्धार्थची एन्ट्री झाली नसती तर तिच्या आयुष्यात तिचं पहिलं प्रेम असतं. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाला भेटले नव्हते, त्याआधी अभिनेत्री गौतम गुलाटीच्या खूप प्रेमात होती. जेव्हा शहनाजने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली, तेव्हा खुद्द अभिनेत्रीने गौतमवर प्रेम करत असल्याचं सांगितलं होतं. 


सिद्धार्थ आणि गौतम व्यतिरिक्त, शहनाजला अभिनेता कार्तिक आर्यन देखील फार आवडतो. आता शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सलमान खानच्या सिनेमातून शहनाज चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आहे.