मुंबई : 'बिग बॉस 13'चा विजेता आणि सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सगळेच दु:खी झाले आहेत. यानंतर सगळ्यांना फक्त शहनाज गिलचीच चिंता होती. शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांची मैत्री कोणापासून लपलेली नाही. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच अभिनेत्री शहनाज गिलने सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासाठी 'तू ये है' हा म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. हे गाणं खूप भावूक आहे. हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. त्याचवेळी, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच शहनाजने आपल्या 'ब्रेकअप'बाबत मौन सोडलं आणि सत्य सांगितलं.


शहनाज गिल अलीकडेच पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझसोबत 'हौसला रख' या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शहनाजने तिच्या आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या बातम्यांबद्दल सांगितलं. नुकतीच तिने दिलेल्या मुलाखतीत तिने सिद्धार्थसोबतच्या ब्रेकअपच्या अफवांवर चर्चा केली.


शहनाज म्हणाली, 'जेव्हा मी सिद्धार्थसोबतच्या माझ्या ब्रेकअपबद्दल ऐकलं तेव्हा मला हसू आलं.' मुलाखतीदरम्यान ती हसली आणि म्हणाली, 'माझे ब्रेकअप झाल्याचं ऐकलं होतं, जे कधीच झाले नाही.' शहनाजच्या बोलण्याच्या शैलीवरून स्पष्ट होतं की तिला अशा गोष्टींची पर्वा नाही.


सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल सोशल मीडियापासून दुरावली होती. तर शहनाज ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक होती जी स्वतःशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी सोशल प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसोबत शेअर करते. त्याचवेळी, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजने पुन्हा स्वत:ला सावरायला सुरुवात केली आहे. चाहत्यांनाही शहनाजला पूर्वीसारखं हसताना आणि हसवताना पाहायचं आहे.