मुंबई : शहनाज गिलने बिग बॉस 13 मधून आपल्या वेगळ्या स्टाईलने आपली खास ओळख निर्माण केली. तिने तिच्या कमकुवतपणाला आपली ताकद बनवली. आज शहनाज सर्वांच्या हृदयात आहे. शहनाजचे लाखो चाहते आहेत. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात. तिचा ताजा फोटो सोशल मीडियावर येताच खळबळ उडवून देतो. त्याचबरोबर, नुकताच शहनाज गिलने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. शहनाज तिच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या प्रसिद्धीबद्दल एक मोठी गोष्ट सांगताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाज गिलने एका मुलाखतीत सांगितलं की, मला मिळत असलेली प्रसिद्धी आणि प्रेम मला खूप आवडतं, ही एकच गोष्ट होती ज्यासाठी मला शेवटी काहीतरी बनण्याची इच्छा होती. मी असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून लोकं मला पाहतील.  यासोबतच अभिनेत्रीने असंही सांगितलं की, मला ही प्रसिद्धी मिळाली आहे. याचा अर्थ ती माझ्या डोक्यात गेली असं नाही. 


यासोबतच शहनाज पुढे म्हणाली की, 'जे लोकं म्हणायचे की, मला कसं बोलावं ते कळत नाही. मला बोलताही येत नाही. त्याचा उच्चार कसा आहे? लोक माझ्याकडे बघून हसायचे, आज तीच माझी ताकद बनली आहे. मला असं वाटतं की, कोणीही कोणाची चेष्टा करू नये. आज लोकं माझ्या वन लाइनर्सवर व्हिडिओ बनवतात. जे मला खूप आवडतात. पण हो हे सगळं माझ्या डोक्यात गेलं नाही. कारण मला माहित आहे की आज मी इथे आहे, उद्या काहीही होऊ शकतं.