Shehzada Box office Collection Day 1 : कार्तिकच्या `शहजादा` नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
Shehzada Box office Collection Day 1 पहिल्याच दिवशी कार्तिक आर्यनच्या `शहजादा` नं कमावले इतके कोटी...
Shehzada Box office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'शहजादा' (Shehzada) हा काल 17 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच याची टक्कर ही शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) आणि 'एंट मॅन 3' (Ant Man 3) शी झाली आहे. तरी देखील कार्तिकच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 'शहजादा' चित्रपटाने जवळपास 6-7 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, त्यांनी हे देखील सांगितलं आहे की अधिकृत आकडे हे थोडे वेगळे असू शकतात. दरम्यान, कार्तिकच्या या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आशा होत्या. त्याचे कारण म्हणून गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटानं लॉक डाऊननंतर प्रेक्षकांना थिएटरकडे वळवलं होतं असं म्हणायला हरकत नाही.
कार्तिकच्या या चित्रपटाची तुलना ही त्याच्या 'भूल भुलैया 2' शी करण्यात येत आहे. कारण या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 14.11 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे चित्रपटानं वर्ल्ड कलेक्शनमध्ये 260 कोटी केली होते.
हेही वाचा : Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला...
दरम्यान, कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) तेलगू चित्रपट 'अला वैकुंठापुरमुल'चा (Ala Vaikunthapurramuloo) अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde) यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनशिवाय क्रिती सेनॉन आणि परेश रावल (Paresh Rawal) यांच्याही या हिंदी रिमेकमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. कार्तिकच्या 'शहजादा' या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई पाहता सगळ्यांचे लक्ष हे विकेंडवर लागले आहेत. शनिवार आणि रविवारी चित्रपट किती कमाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.