मुंबई : शेखर कपूर हे नाव बॉलिवूडमध्ये फारच प्रसिद्ध आहे. पण लवकरच शेखर कपूर बॉलिवूडमधून थेट चीनी सिनेमांकडे आपला मोर्चा वळवणार आहेत. 


पटकथेवर काम सुरू   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शेखर कपूर सध्या ब्रुस लींच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहेत. या चिनी चित्रपटाच्या पटकथेची जबाबदारी शेखर कपूर यांनी सांभाळली आहे. 


लिटल ड्रगन या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. शेखर कपूर यांचा हा पहिला चीनी  चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट ब्रुस ली यांची कन्या शैनन ली हिने लिहला आहे. 


चीनी कंपन्यांचा सहभाग 


ब्रुस ली यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी काही चीनी कंपन्या फायनान्स आणि निर्मिती करणार आहेत. 


ब्रुस लींचा जीवनपट 


या चित्रपटामध्ये हॉलिवूडमध्ये प्रवएश करण्यासाठी ब्रुस लींनी हॉंगकॉंग सोडले. तसेच ७० च्या दशकामध्ये 'कुंग फू' चित्रपट बनण्यापूर्वी त्या6चे जीवन कसे होते? हा संघर्ष फीचर फिल्ममध्ये दाखवण्यात येणार आहे. 



भारतीय चित्रपट चीनमध्येही लोकप्रिय 


शेखर कपूर यांनी भारतीय चित्रपटांना चीनमध्ये लोकप्रियता असल्याचे सांगितले आहे. 'दंगल' हा चित्रपट चीनमध्येही लोकप्रिय ठरला होता.