SSR Case : बॉलिवूड अभिनेत्यानं AIIMSचा रिपोर्ट नाकारत केला गंभीर दावा
सुशांतचा खून नाही तर आत्महत्या असल्याची माहिती एम्सच्या पॅनलने दिली आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील वातावरण चांगलचं तापलं होतं. घराणेशाही, गटबाजी त्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन इत्यादी गोष्टींमुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आता एम्स रुग्णालयाच्या एका रिपोर्टने सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. सुशांतसिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
एम्सच्या रिपोर्टवर बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने मात्र नकार दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने याप्रकरणी आपला संताप व्यक्त केला. 'सुशांतच्या न्यायासाठी आम्ही सर्वांनी लढा दिला. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आवाज उठवला. मात्र याप्रकरणाने आपली दिशा बदलली. परंतु आम्ही आम्ही अद्याप माघार घेतली नसल्याचं वक्तव्य त्याने केलं.
शिवाय सीबीआयकडून अंतिम रिपोर्ट येणार आहे. तो रिपोर्ट देखील प्रकरणाला न्याय देणारा नसेल तर आम्ही ही लढाई आमच्या मनात चालू ठेवू कारण सत्य काय आहे हे आम्हाला ठावूक आहे, अशा प्रकारे AIIMS चा रिपोर्ट नाकारत सुशांत प्रकरणाला हायजॅक करण्यात आल्याचा गंभीर दावा शेखर सुमनने केला.