मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) 'बॉयकॉट बॉलिवूड' (Boycott Bollywood) आणि 'बॉयकॉट' सारख्या काही ट्रेंडवर असे उत्तर दिले की तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय. हिंदी चित्रपटांवर सातत्यानं बंदीची मागणी होत असल्यामुळं त्यानं हल्लीच एका मुलाखतीत आपली बाजू मांडताना लक्षवेधी वक्तव्य केलं. अर्जुनच्या वक्तव्यावर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं (Sherlyn  Chopra) अर्जुनच्या बॉयकॉट वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं बॉलिवूडला फटकारले असून अर्जुन कपूरची खिल्ली उडवली आहे. 


आणखी वाचा : 'बिग बॉस 16' साठी सलमान खाननं वाढवलं तिप्पट मानधन, मागितली 'इतकी' रक्कम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्लिन चोप्रानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिले की, अर्जुन कपूर म्हणाला,'आता आम्ही गप्प बसणार नाही, बहिष्कार घालणाऱ्यांना दाखवू.. अरे भावा, जे दाखवायचं होतं ते रणवीरनं दाखवून दिलं आहे. आता तू देखील दाखवशील का? या ट्वीटमध्ये शर्लिन चोप्रानं रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर नाव न घेता वक्तव्य केलं आहे.'


आणखी वाचा : ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल



आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


शर्लिनचं हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सडेतोड उत्तर दिले आहे. नेटकऱ्यांनी शर्मिलाला तिच्या बोल्ड फोटोशूटची आठवण केली. तिचे काही फोटो नेटकऱ्यांनी तिच्या ट्वीटवर रिप्लाय करत शेअर केले आहेत. 


आणखी वाचा : किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video


प्रत्यक्षात (aamir khan, Akshay umar) आमिर खान आणि अक्षय कुमार (Laal Singh chaddha, Raksha bandhan) यांच्या चित्रपटांच्या निमित्तानं या वादाला तोंड फुटलं होतं. यामध्ये कुठेही अर्जुनच्या चित्रपटांचा विरोध केला गेला नव्हता. पण, तरीही त्याचं या विषयावर बोलणं अनेकांनाच खटकलं.