Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. शर्लिन ही नेहमीच असं काही करते की सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. शर्लिनच्या कपड्यांपासून तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शर्लिननं केलेल्या वक्तव्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. शर्लिननं कॉंग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये शर्लिननं राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याविषयी म्हटलं आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर आणि इन्स्टाग्राम पेज फिल्मीग्याननं शेअर केला आहे. खरंतर, या व्हिडीओत एक व्यक्ती शर्लिनला प्रश्न विचारते की तुला राहुल गांधी यांच्याशी लग्न करायला आवडेल का? त्यावर उत्तर देत शर्लिननं म्हणाली हो. फक्त माझी एकच अट आहे. ती म्हणजे लग्नानंतर माझं आडनाव हे चोप्राचं राहिल. शर्लिन यावेळी एका बीचवर होती. या व्हिडीओत तिचे अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



शर्लिनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की राखी सावंत करत असलेला नशा हिनं देखील केला. एक नेटकरी म्हणाला 'राहुल गांधीला त्याचं आयुष्य खराब करायचं नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझ्याशी तर तो कधीच लग्न नाही करणार.' तिसरा नेटकरी शर्लिनला ट्रोल करत म्हणाला, 'तू करशील पण तो नाही करणार.'


शर्लिन विषयी बोलायचे झाले तर तिचं नाव तेव्हा चर्चेत आलं होतं तेव्हा साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी तिनं खूप जास्त प्रयत्न केले होते. पण, ती तिच्या या कामात अपयशी ठरली होती. साजिदला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी शर्लिन पोलिस स्टेशनमध्ये देखील गेली होती. इतकंच नाही तर तिनं त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती. 


हेही वाचा : 'वडील गरजेचे आहेत पण...', सिंगल मदर असलेल्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य


दरम्यान, सोनिया गांधी यांनी एकदा सांगितलं होतं की राहुल लग्नासाठी ऐकत नाही, तुम्हीच त्याच्या लग्नाचं पाहा. त्यामुळे आता लग्न करा असा सल्ला लालू यादव यांनी दिला. लालू यादव यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना त्यांच्या दाढीवरुन सल्ला दिला होता. दाढी आणखी वाढवू नका. 'तुम्ही माझा सल्ला ऐकला नाही, अजून लग्न केलं नाही. पण अजूनही वेळ गेलेला नाही लग्न उरकून टाका. वराती म्हणून आम्ही येऊ' असं लालू यादव म्हणाले आणि एकच हशा पिकला.