Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवत आहे. तिची ताली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय, आर्या या सीरीजचा पुढचा पार्ट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुष्मिता तिच्या करिअरमध्ये यशस्वी आहे. त्याचप्रमाणे तिला वाटतं तसं ती तिचं आयुष्य जगते. तिला जेव्हा आई होण्याची इच्छा झाली तेव्हा तिनं दोन मुलांना दत्तक घेतलं. एक सिंगल पेरेंट म्हणून तिनं त्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला. सुष्मितानं कोणत्याही गोष्टीची चिंता न करता तिचं आयुष्य जगलं आहे. आता इतक्या वर्षानंतर सुष्मिता तिच्या मुलींविषयी बोलली आहे. त्यावेळी बोलताना सुष्मिता म्हणाली की काही लोकांना वाटतं की तिच्या मुलींना वडील नाही म्हणून त्यांचं आयुष्य हे असंतुलित आहे. पण असं नाही हे म्हणतं सुष्मिताना आपल्या आयुष्यात वडील असणं खूप महत्त्वाचं असतं असं देखीला सांगितलं.
सुष्मितानं नुकतीच ही मुलाखत ईटाइम्सला दिली आहे. सुष्मिता एक सिंगल मदर असलेल्या लोकांच्या काही चुकीच्या विचारावर बोलत असताना म्हणाली की 'आपल्याला त्या गोष्टींची आठवण येत नाही ज्या आपल्याकडे कधीच नसतात. असं म्हणतात की... जर ते वडिलांशिवाय लहाणाचे मोठे होतात तेव्हा त्यांचं आयुष्य असंतुलीत होतं. आपल्या आयुष्यात वडील असणं आवश्यक आहे, पण इतर गोष्टींप्रमाणेच आपल्याला त्या गोष्टींची आठवण येत नाही जी तुमच्या आजुबाजूला कधीच नसते. ही संकल्पनाचं चुकीची आहे,' असं सुष्मिता म्हणाली.
हेही वाचा : पती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
मुलींना दत्तक घेण्यावरून सुष्मितावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर एक पोस्ट शेअर करत म्हणाली होती की, रेनेचा जन्म माझ्या हृदयातून झाला होता. जेव्हा मी फक्त 24 साल होती. हा एक खूप मोठा निर्णय होता. अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. दत्तक का घेतलं? ते देखील लग्न न करता तू कसं काय त्यांचा सांभाळ करशील? तू सिंगल पेरेंट होण्यासाठी तयार आहेस? तुला या गोष्टीची जाणीव आहे का की तुझ्या या निर्णयाचा तुझ्या कामावर आणि तुझ्या खासगी आयुष्यावर काय परिणाम होईल? असे अनेक प्रश्न आहेत. सुष्मिताला दोन मुली असून रेने आणि अलीशा अशी त्यांची नावं आहेत. रेनेला सुष्मितानं 24 वर्षांची असताना दत्तक घेतलं. तर 2010 मध्ये अलीशाला दत्तक घेतलं होतं.