मुंबई  : राज कुंद्राच्या अश्लील चित्रपटाच्या प्रकरणात नव-नवीनन ट्विस्ट समोर येत आहेत. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्यावर अश्ली-ल व्हिडिओ शूट करणं आणि एका अॅपमधून ते रिलीज करण्यासारखे अनेक गंभीर आरोप आहेत. या दिवसांत, इरॉटिक परफॉर्मर आणि मॉडेल पूनम पांडे या विषयावर विधान समोर आलं होतं, त्यानंतर प्लेबॉय मासिकाची कव्हर गर्ल असलेल्या बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्लिन चोप्राचा व्हिडिओ आला समोर 
पूनमने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की, तिला शिल्पा आणि तिच्या मुलांची काळजी वाटते, त्यानंतर आता शर्लिन चोप्राचाही एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती राखाडी रंगाची साडी आणि ब्लाउज परिधान करताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा राज कुंद्रा प्रकरणावर खुलेपणानं आपलं मत व्यक्त करताना दिलसी आहे. या व्हिडिओमध्ये तिने पूनम पांडेच्या विधानावरही हल्ला केला आहे. शर्लिनने या व्हिडीओमधून पूनमच्या विधानावर अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहेत की, 'तिने देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला नाही'.


लोकांच्या आवाहनावर व्हिडिओ शेअर केला
व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा म्हणाली, 'नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून बरेच पत्रकार मला फोन करीत आहेत मला मॅसेज करत आहेत की, माझं या विषयावर काय म्हणणं आहे. मी आपल्या सर्वांना सांगू ईच्छिते की, महाराष्ट्र सायबर सेलच्या तपास पथकाला आपलं पहिलं विधान दिलं ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून ती मी आहे. मी महाराष्ट्रातील सायबर सेलला आर्म्स प्राइम बद्दल माहिती देणारी व्यक्ती आहे.


शर्लिनचं पूनम पांडेला उत्तर
शर्लिन चोप्राने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'मला म्हणायचं आहे की, जेव्हा महाराष्ट्र सायबरद्वारे मला समन्स नोटीस पाठवल्या गेल्या होत्या, आणि जे इतरांप्रमाणे म्हणतात... 'माय हार्ट गोज़ आउट फॉर शिल्पा एंड हर किड्स' तेव्हा मी अंडरग्राउंड नव्हती. गायब झाले नव्हते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रकरण कोर्टाच्या अंडर आहे, मी काहीही बोलणार नाही
शर्लिन चोप्रा म्हणाली की, तिने हे शहर किंवा देश सोडून पळून जायचा प्रयत्न केला नाही. मार्च 2021 मध्ये तिने सायबर सेलच्या कार्यालयात जाऊन आपलं निःपक्षपाती विधान केलं. मित्रांनो, या विषयावर बरेच काही सांगण्यासारखं आहे, मात्र हे प्रकरण अद्याप कोर्टाच्या अधीन असल्यामुळे मला त्यावर जास्त काही बोलण अयोग्य वाटतं. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधावा असं आवाहन करते. आणि शक्य असल्यास माझ्या विधानाचं काही भाग त्यांना सांगायला विनंती करा.