Tunisha Sharma Suicide Case​ : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये (ali baba dastaan e kabul) शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma news) अचानक जगाचा निरोप घेतला. कोणाच्या धानीमनी नसताना वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माने मृत्यूला कवटाळलं. या प्रकरानंतर तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma) खास मित्र आणि 'अली बाबा' मालिकेतील अभिनेता शीजान खान याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईचे वक्तव्य समोर आले आहे. शीजनच्या आई आणि बहिणीने आज (02 डिसेंबर ) पत्रकार परिषद घेऊन तुनिषाच्या आईने केलेल्या आरोपांवर मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा : राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील 


यावेळी पत्रकार परिषदेत शीझान खानच्या आईने सांगितले की, तुनिषा माझ्या मुलीसारखी होती. आम्ही कधीही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. तुनिषा मला अम्मा म्हणायची, शीजानवरचे आरोप चुकीचे आहेत. दुसरीकडे, शीजानच्या बहिणीने तुनिषासोबत बहिणी सोबत चांगले संबंध असल्याचे म्हटले आहे. तुनिषाला आम्ही खूष ठेवत होतो. तुनिषासोबत आमचे संबंध खूप चांगले होते, असे शीजान खानच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.  तसेच आपण कोणता धर्म मानतो हा आपल वैयक्तिक असतो. आम्ही कोणावर दबाव आणत नाही, दर्गा आणि हिजाबची चर्चा चुकीची आहे. व्हायरल होत असलेला हिजाबचा फोटो शोमधील असल्याची माहिती शीजान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. 


शीजानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, तुनिषाचे तिच्या कुटुंबासोबतचे संबंध चांगले नव्हते. वडिलांच्या मृत्यूनंतर ती नैराश्यात होती. तिने तिचा शेवटचा वाढदिवस वडिलांसोबत आनंदाने साजरा केला होता. त्यानंतर ती आता तो साजरा करणार होती. तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांच्यात काय संबंध आहेत याचा शोध घेतला जात आहे. तुनिषाची आई आणि संजीव कौशल तुनिषावर पूर्ण नियंत्रण ठेवायचे. संजीव कौशलचे नाव ऐकताच तुनिषा घाबरायचे. तुनिशा आणि तिच्या पैशांवर संजीव कौशल आणि वनिता यांचा पूर्ण ताबा असायचा अशी माहिती  शैलेंद्र मिश्रा यांनी दिली. 


वाचा : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा


दरम्यान अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीझा खान (27) याला  26 डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील वालीव पोलिसांनी अटक केली होती. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेत काम करणारा 21 वर्षीय शर्मा 25 डिसेंबर रोजी वसईजवळ शोच्या सेटवर वॉशरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. खानने फसवणूक करून तिच्या मुलीचा वापर केल्याचा आरोप शर्मा यांच्या आईने केला आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की, खानने आपल्या मुलीला एका टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर थप्पड मारली होती ज्याचा ते दोघेही भाग होते आणि तो शर्माला उर्दू शिकवत होता आणि तिला हिजाब घालायचा होता.