मुंबई : टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानी लवकरच एका नव्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. या अभिनेत्रीने नेहमी पॉझीटिव्ह कॅरेक्टर केले पण आता पहिल्यांदाच तुम्ही हिला निगेटीव्ह भूमिकेत पाहणार आहात. 'कलीरे' या सिरिलयमधली तिची भूमिका पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. दरम्यान बॉलीवूड भास्करला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य केलय. 'मला लवकरच आई बनण्याची इच्छा आहे. खरतर काही वर्षांपूर्वी मी आणि अपूर्वाने फॅमिली प्लानिंग सुरु करणार होतो. पण तस झालं नाही. त्यामुळे माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. अपूर्वा आणि मी एकमेकांना साथ दिली. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याच्यावर जास्त विचार न करण्याचे आम्ही ठरवले. पण लवकरच आमच्याकडे मुल असतील हे मला माहितेय. आम्ही दोघ एकमेकांवर खूप प्रेम करतो' असे तिने सांगितले.


बाळ दत्तक घेणार 


दरम्यान बाळ दत्तक घेण्यासंबंधी तिला विचारण्यात आले. भविष्यात आम्ही याबद्दल विचार करु असे तिने सांगितले. प्रेग्नेंसीसाठी मी मेडिकली अनफिट होती यासाठी मला काहीकाळ वाट पाहण्यास सांगितलं गेल होतं. आम्ही यावर्षी याबद्दल विचार करु असंही होऊ शकत. पण मी एक बाळ तरी नक्की दत्तक घेईन असे तिने सांगितले.