Money Laundering Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील त्यांचे घर आणि फार्महाऊस रिकामे करण्याची ईडीने नोटीस पाठवली होती. आता ईडीच्या या नोटीसविरोधात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही याचिका आज न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत पाटील यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली असून गुरुवारी दुपारी ही याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


राज कुंद्राच्या याचिकेत काय? 


27 सप्टेंबर 2024 रोजी ईडीकडे बेदखल नोटीस जारी करण्याचे आदेश माहितले आहेत. जेणेकरून त्यांचे हक्क आणि त्यांच्या कुटुंबाला मनमानी कारवायांविरुद्ध आश्रय मिळावा. ज्यामध्ये कुंद्रा आणि त्यांच्या पत्नीला त्यांची मालमत्ता मुंबईतील निवासी घर आणि पुण्यातील फार्महाऊस 10 दिवसांच्या आत खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईडीने त्यांना 3 ऑक्टोबर रोजी घराबाहेर काढण्याची नोटीस दिली होती. 


2018 पासून ही कारवाई सुरु आहे. जेव्हा ईडीने अमित भारद्वाज विरुद्ध कथित क्रिप्टो मालमत्ता पोंजी स्कीममध्ये गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह अन्य अरोपींवर बिटकॉइनच्या रुपात गुंतवणूकदारांची 6 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शिल्पा शेट्टीच्या वकिलाने याचिकेत म्हटलं आहे की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे या प्रकरणात ईडीला सहकार्य करत आहेत. त्यांनी 2018 ते 2024 दरम्यान ईडीने पाठवलेल्या सर्व समन्सला उत्तर दिले आहेत. 


ईडीचे आरोप काय? 


आरोपींनी बिटकॉइनच्या रुपात दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. या आश्वासनांद्वारे आरोपींनी बिटकॉइन्सच्या रुपात लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले होते. त्यानंतर कंपनीने मालमत्ता खरेदी करण्यासाठी 9 कंपन्यांमार्फत 6606 कोटी रुपयांचा निधी वळवला.