मुंबईः  अभिनेत्री शिल्पा शेट्टी जेव्हाही रॅम्पवर चालते तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावरच थांबतात. पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीचा असाच बोल्ड लूक रॅम्पवर पाहायला मिळाला. एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरसाठी शिल्पाने रॅम्प वॉक केला. यावेळी देसी पेहरावात शिल्पा दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिल्पाने रॅम्प वॉकसाठी मल्टिकलर लेहंगा आणि चोली परिधान केली होती तर दुपट्टा हातात घेत शिल्पाने तिची फिगर फ्लॉन्ट केल्याचं दिसून आलं. शिल्पाच्या या लेहेंगा चोलीमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगांचा अधिक वापर करण्यात आला होता. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, शिल्पाने तिचे केस खुले ठेवले आणि मेकअपसह हाय हील्स घातल्या.



फॅशन वीकमध्ये शिल्पा शेट्टीने रॅम्पवर पाऊल ठेवताच आपल्या स्टाईलने सर्वांवर मोहिनी घातली. या लूकमध्ये शिल्पा इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती की, तिच्या रॅम्पवॉकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत झालेल्या फॅशन वीकमध्ये शिल्पा शेट्टी शोस्टॉपर ठरली.



या ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीची टोन्ड फिगरही चर्चेत होती. जे पाहून कोणालाही त्याच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. शिल्पा शेट्टी ही फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेते. वर्कआऊटचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.


जीम, योगासह डाएटबाबतीतही शिल्पा प्रचंड जागरूक आहे. शिल्पाच्या सौंदर्याचं गुपित तिचा फिटनेस प्लान आहे असं तिने अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. शिल्पा शेट्टी लवकरच 'निकम्मा' चित्रपटात दिसणार आहे.