शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या आरोपांवर शर्लिन चोप्राने दिलं उत्तर
राज-शिल्पाविरोधात लैंगिक छळाचा आरोप अभिनेत्रीने केला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांनी प्लेबॉय फेम अभिनेत्री शर्लिन चोप्रावर 50 कोटींचा दावा दाखल केला आहे. या बॉलिवूड पॉवर कपलने शर्लिन चोप्राविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. दुसरीकडे, शर्लिन चोप्रा हिने या आरोपांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे आरोप पूर्णपणे निराधार आणि बनावट आहेत. शर्लिन चोप्रा हिने अलीकडेच राज-शिल्पाविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.( SHILPA, RAJ SLAP SHERLYN WITH RS 50 CRORE DEFAMATION CASE)
शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केलाय. या दाम्पत्याच्या वकिलाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'शर्लिन चोप्रा यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर केलेले सर्व आरोप हळवे, बनावट आणि निराधार आहेत. याचा एकही पुरावा नाही.
शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्रावर पॉर्न फिल्मचे शुटींग आणि नंतर एका अॅप्लिकेशनच्या मदतीने त्यांना रिलीज केल्याचा आरोप आहे. गंदी बात फेम अभिनेत्री गहना वसिष्ठ सुरुवातीपासूनच राज कुंद्राच्या समर्थनार्थ राहिली आहे, तर शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या जोडप्याच्या विरोधात बोलत आहेत.
या प्रकरणात, राज कुंद्रा ने पूर्ण 2 महिने जेलची हवा खाल्ली आहे. 21 सप्टेंबर 2021 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली परंतु प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने वर्क फ्रंटमधून ब्रेक घेतला आणि बराच काळ ती दिसली नाही. पण आता पुन्हा एकदा अभिनेत्री पूर्ण फॉर्ममध्ये आली आहे.