मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने पॉर्नोग्राफी प्रकरणी जेलतून बाहेर आल्यानंतर मोठे पाऊल उचलले आहे. राजने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे.  राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर त्याचे खाते आता दिसत नाही. कदाचित लोकांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी हे केले असावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायचा. राजने अनेकदा पत्नी शिल्पा शेट्टीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांनी प्रचंड प्रेम केले. पण आता त्याने सोशल मीडियावरून अकाउंट डिलीट केलं आहे. दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर त्याला तब्बल  2 महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला. 


पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक
जुलैमध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला सुमारे दोन महिने जेलमध्ये काढावे लागले. सध्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना आणि सभांना जाण्याचे राज टाळत आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा कुटुंबासोबत दिसत नाही. अलीकडेच शिल्पा तिची मुले विआन आणि शमिशासोबत अलिबागमध्ये दिसली होती पण राज कुंद्रा तिथे दिसला नाही.


सप्टेंबरमध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्राला दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.