मुंबई : सलमानसोबत पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्दीझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री सध्या तिच्या मुलामुळे चर्चेत आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीने 'मर्द को दर्द नही होता'मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकाचा प्रतिसाद नाही मिळाला. मात्र चित्रपट समिक्षकांनी अभिमन्युच्या कामाचं कौतुक केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिमन्यु दसानी आगामी 'निकम्मा' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिमन्युसोबत एक खास चेहराही मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी, यूट्यूब सेन्सेशन शेर्ली सेतिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली. सब्बीर खान 'निकम्मा' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 




हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. शेर्ली सेतिया यूट्यूबवर, सोशल मीडियावर नेहमीच तिच्या नवनविन व्हिडिओमुळे चर्चेत असते. आता शेर्लीला बॉलिवूडमध्ये किती पसंती मिळते? बॉलिवूडची ही नवी जोडी बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.