मराठमोळा शिव ठाकरे `खतरों के खिलाडी` च्या एका एपिसोडसाठी घेणार लाखोंचं मानधन!
Shiv Thakare in Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे हा लवकरच `खतरों के खिलाडी` या शो मध्ये आपल्याला धमाकेदार आणि डेन्जरस स्टंट करताना दिसणार आहे. तर या शोसाठी शिव ठाकरे हा लाखोंचं मानधन घेणार असून हे तो एका एपिसोडसाठी घेणार आहे.
Shiv Thakare in Khatron Ke Khiladi 13 : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 16' मुळे प्रकाश झोतात आलेल्या शिव ठाकरे आज हजारोंच्या हृदयावर राज्य करतो. शिव ठाकरेनं (Shiv Thakare) या शो मध्ये येत ट्रॉफी जिंकली नाही मात्र, लोकांची मने जिंकली. आता शिव ठाकरे लवकरच आपल्या सगळ्यांना लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Roshit Shetty) 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसणार आहे. त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पण तुम्हाला माहितीये का या शोसाठी शिव ठाकरेला सगळ्यात जास्त मानधन देण्यात येणार आहे.
'खतरों के खिलाडी' 13 विषयी बोलायचे झाले तर हा शो आता प्रदर्शित होणार नाही आहे. त्याआधीच कोण कोणते सेलिब्रिटीज हे या शोचा भाग होऊ शकतात याविषयी चर्चा सुरु आहे. तर शिव ठाकरेचे नाव फिक्स असल्याचे म्हटले जाते. तर या शोसाठी त्यानं खास तयारी करण्यासही सुरुवात केल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्यासाठी तो पोहायचं शिकत आहे. फिजीकली तयारी करत आहे. तर तो या शोसाठी सगळ्यात जास्त मानधन घेणारा सेलिब्रिटी आहे.
Siasat.com नं दिलेल्या रिपोर्टनुसार, शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी 13' च्या प्रत्येक एपिसोडसाठी शिव ठाकरे हा 5 ते 8 लाख रुपये मानधन म्हणून घेणार आहे. याचाच अर्थ तो एका आठवड्यासाठी 10 ते 16 लाख रुपये येणार आहे. पण या बातमीवर शिव किंवा कोणीही दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा : आलियाची चप्पल उचलून देवासमोर ठेवल्यानं रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले 'त्याला साधी इतकी...'
'खतरों के खिलाडी 13' च्या इतर सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाले तर कुंडली भाग्य फेम अभिनेत्री अंजुम फकीह आणि रुही चतुर्वेदी आहेत. या शिवाय अंजली आनंद देखील यावेळी दिसणार आहेत. यंदाच्या सीझनसाठी आतापर्यंत निश्चित झालेल्या या चार सदस्यांची नावं समोर आली आहेत. या शोमध्ये 'बिग बॉस 16' फेम प्रियंका चाहर चौधरी आणि अर्चना गौतम या देखील असणार अशा चर्चा सुरु आहेत. पण त्यानंतर प्रियंका या शोमध्ये नसेल असं तिनं स्पष्ट केलं. तर तिच्याशिवाय आणखी एका नावाची चर्चा होती. तो म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण टॅकर. करणनं देखील तो या शोमध्ये येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर यंदाचं सीझन हे आपल्याला जून महिन्यापासून पाहता येणार आहे, अशी चर्चा सुरु आहे.