आलियाची चप्पल उचलून देवासमोर ठेवल्यानं रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले 'त्याला साधी इतकी...'

Ranbir Kapoor Troll : रणबीर कूपर आणि आलिया भट्ट हे पॅमेला चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्य चोप्रा यांच्या घरी पोहोचले होती. त्यावेळीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रणबीरचं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Updated: Apr 23, 2023, 12:33 PM IST
आलियाची चप्पल उचलून देवासमोर ठेवल्यानं रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले 'त्याला साधी इतकी...' title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Ranbir Kapoor Troll : आदित्य चोप्रा यांच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी आदित्य चोप्राची आई पॅमेला चोप्रा यांचे निधन झालं. पॅमेला यांच्या निधनाच्या बातमीनंतर सगळेच बॉलिवूड सेलिब्रिटीज त्यांच्या घरी पोहोचले होते. या दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं देखील हजेरी लावली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीरनं पत्नी आलियाची चप्पल उचलली होती. त्यावरून त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

रणबीरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी आणि विरल भयानीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्या व्हिडीओत सुरुवातील आदित्य चोप्रा यांच्या घरात जात असताना आलिया दारातच चप्पल काढते. त्यानंतर तिच्या मागून येणाऱ्या रणबीरनं तिची चप्पल उचलून घराच्या आत दरवाज्याच्या जवळ ठेवली. रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी दोघेही अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आलियाने पांढरा लखनवी कुर्ता तर रणबीर पांढऱ्या टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक नेटकरी रणबीरच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, 'भाऊ चप्पल चोरी झाली तर नुकसान होईल, तो खूप हुशार आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळं कॅमेऱ्यासाठी करत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आलियानं स्लिपर काढली आणि रणबीरनं नाही काही कळलं नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'यात क्यूट बोलण्यासारखं काय आहे. कोणी चुकून चप्पल घालूण निघून गेलं तर.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अरे हा तर तोच आहे जो काही दिवसांपूर्वी आलियाच्या ओढणीला लाथेनं तुडवलं होतं. तेव्हा चांगलाच ट्रोल झाला होता आणि आज ते कव्हरअप करण्यासाठी आता हे सगळं करतोय. जेणेकरून त्याला चांगला नवरा बोलती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा मुर्खपणा आहे. तो आत चप्पल घालून का गेला. ओव्हर अॅक्टिंग.' तिसरा म्हणाला, 'आलियानं मंदिर पाहिलं आणि तिनं चप्पल बाहेर काढली... पण रणबीरला कळत नाही त्यानं चप्पल उचलून देवासमोरच ठेवली.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकीकडे ट्रोलिंगचा शिकार झालेल्या रणबीरची दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'पुरुष फक्त त्याच्या आवडत्या महिलेची चप्पल उचलतो. जसं रणबीरनं आलियाची चप्पल उचलली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अशा प्रकारे द्वेष पसरवणं बंद करा, तो तिची काळजी घेतोय.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : VIDEO : कतरिना कैफ प्रेग्नंट! ओढणी आणि हातानं लपवताना दिसली बेबी बंप?

रणबीरच्या कामाविषयी बोलयाचं झालं तर तो लवकरच ‘एनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. तर आलियाचा लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे