शिवाजी साटम एकेकाळी बँकेत होते कॅशियर...`या` व्यक्तीमुळे बदललं आयुष्य
`दया तोड दो ये दरवाजा` म्हणणारे एसीपी प्रद्युमन बँकेत होते कॅशियर...कॅशियर ते सीआयडी कसा होता त्यांचा प्रवास..जाणून घेऊयात
'दया तोड दो ये दरवाजा' म्हटलं की आठवते सोनी टीव्हीवरील सीआयडी मालिका. गेल्या अनेक वर्षांपासून सीआयडी ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एसीपी प्रद्यमन यांची भूमिका करणारे शिवाजी साटम यांचा आज 72वा वाढदिवस..यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 रोजी मुंबईमधील माहिम येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात ग्रॅज्युएशन केल्यानंतर बँक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला.
डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी बँकेत कॅशियर म्हणून काम केले. अनेक वर्ष त्यांनी बँकेतच नोकरी केली. मात्र नोकरी करतानाही त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. अनेक नाटकांमधून ते काम करत असत.
रामायणात राजा दशरथाची भूमिका साकारणाऱ्या बाळ धुरी यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. बाळ धुरी यांनी शिवाजी यांना अभिनयात पदार्पण करण्यासाठी संधी दिली. शिवाजी यांनी 1988 मध्ये रिलीज झालेल्या 'पेस्टोन'जी या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
शिवाजी साटम यांच्या 'नायक', 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'चाइना गेट', 'यशवंत', 'जिस देश में गंगा रहता है', 'हू तू तू' आणि 'सूर्यवंशम' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 1998 मध्ये आलेल्या सीआयडी या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.
सीआयडी ही मालिका त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरली. या मालिकेने सलग 111 मिनिटे शूटिंग करून या मालिकेची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड' आणि 'लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स'मध्ये नोंद झाली.