Shivali Parab On Prajakta Mali and sai tamhankar : छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणारी कॉमेडी मालिका म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोनं सगळ्यांना खिळवून ठेवलं होतं. या कॉमेडी शोमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये असलेली अभिनेत्री शिवाली परब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचं कोहली फॅमिलीचं स्किट तर प्रेक्षकांच्या लक्षाच राहिलेलं आहे. तर शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आता तिनं दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवालीनं नुकतीच एका प्रतिष्ठीत माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितलं आहे. यावेळी शिवालीला प्रश्न विचारण्यात आला की सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी या सेटवर कशा असतात. शिवाली यावेळी सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी यांच्या विषयी सांगताना म्हणाली, 'सई ही खूप प्रेरणादायी आहे. तिच्याकडून मुलींना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उगाचच तिला बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं आम्ही म्हणत नाही. ती खरंच तशीच आहे. सई विचारांनी खूप बोल्ड आहे आणि तिचे बरेच विचार हे मुलींनी घ्यावेत असं मला वाटतं. ती खूप बिनधास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून ती खूप चांगली आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे प्राजक्ताविषयी सांगत शिवाली म्हणाली, प्राजूताई खूपच गोड आहे. ती खूप नम्र स्वभावाची आहे. रात्री जेव्हा शूटिंग संपते तेव्हा आम्ही सगळे खूप दमलेलो असतो. तेव्हा तिच्याकडे पाहून आम्हाला एनर्जेटिक फील होतं. जर काही चुकलं तर ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेते. ती खरंच खूप गोड आहे.'


हेही वाचा : The Kerala Story Collection Day 2 : दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतक्या कोटींची वाढ


शिवालीनं या मुलाखतीत अनेक खुलासे केले. यावेळी तिच्या क्रशविषयी देखील शिवालीनं सांगितलं आहे. शिवालीनं सांगितलं की तिला शाहरुख खान खूप आवडतो. शिवाली म्हणाली, 'मला शाहरुख खान खूप आवडतो. खूप म्हणजे प्रचंड आवडतो. कोणी विचार करू शकणार नाही इतकं माझं शाहरुखवर क्रश आहे. मी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहते की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो आणि त्यांच्या फॅन्सना भेटून सरप्राइज देतो वगैरे. असं काही माझ्यासोबत व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे. एकंदरीत माझं शाहरुखवर खूप मोठं क्रश आहे.'  शिवाली ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.