पतीनं विवाहबंधनातून मुक्त केल्यानंतर, संन्यास घेत अभिनेत्री हिमालयाकडे रवाना
अभिनेत्रीच्या निर्णयानं अनेकांनाच धक्का
मुंबई : टेलिव्हिजन विश्वात जवळपास गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीनं तिच्या निर्णयानं सर्वांनाच धक्का दिला आहे. आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं हा निर्णय तिला योग्य वाटला आणि त्या निर्णयानुसार तिनं पैसा, प्रसिद्धीचा त्यागही केला. ही अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार. (Shocking Actress Nupur Alankar quits industry as she takes sanyas)
यंदाच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिनं संन्यास घेण्यातचा निर्णय घेतला. उर्वरित आयुष्य अध्यात्मात व्यतीत करण्यासाठी तिनं हे पाऊल उचललं. हा एक मोठा निर्णय असून, पर्वतराज हिमालय आपला हा प्रवास सुकर करेल अशी आशा तिनं व्यक्त केली.
प्रवास आणि प्राथमिक गरजांसाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळासाठी नुपूरनं तिचं मुंबईतील घर भाड्यानं दिल्याचं कळत आहे. आता आपल्या आयुष्यात बनेलपणाला स्थान नाही असंही तिनं स्पष्ट केलं.
'जेव्हा मी या झगमगणाऱ्या विश्वाचा भाग होते, तेव्हा मला प्रसिद्धी आणि यशाची भीती वाटत होती. आज मात्र मी शांततेच्या वाटेवर आले आहे', असं म्हणताना नुपूरनं आपण पतीसोबत असणारं वैवाहिक नातं संपवण्याच्या मार्गावरही असल्याचा खुलासाही केला.
अध्यात्मिक वाटेवर जाण्यासाठी पती, अभिनेता अलंकार श्रीवास्तव यांनी आपल्याला या लग्नाच्या पाशातून मोकळं केल्याची बाब यावेळी पहिल्यांदाच समोर आली. अर्थात कायदेशीररित्या त्यांच्या वाटा अद्याप वेगळ्या झालेल्या नाहीत.