Amitabh Bachchan : प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक खास व्यक्ती असतेच, आपल्या आयुष्यातील सर्व सुख दुःख जिच्याशी आपण मनमोकळेपणाने शेअर करतो (special person in life) आपल्या आयुष्यात काय घडतंय. एक दिवस असा येतो कि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते ती आपल्याला कायमच सोडून जाते तेव्हा मात्र आपण कोलमडून पडतो तुटून जातो . अश्या वेळी काय करावं ते आपल्याला सुचत नाही.. (sad and pissed off)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतच 
सामान्य माणूस असो वा कलाकार दुःख कोणालाच चुकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सुद्धा असच काहीस घडलं आहे. त्यांचा खास जवळचा मित्र त्यांना सोडून गेला आहे. त्यांच्या या खास मित्राने अखेर जगाचा निरोप घेतलाय. हा मित्र गेली अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. ते ज्यांना बेस्ट फ्रेंड म्हणायचे त्याच्या जाण्याने  बिग बी खूप दुखी झाले आहेत. 


आणखी वाचा: Viral : King Cobra चा शाम्पू बाथ पाहिलात का ? Video पाहून नेटकरी स्तब्ध...


सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती


बिग बींच्या जवळचा हा खास मित्र म्हणजे त्यांचा कुत्रा.. जवळच्या खास कुणीतरी जाण्याने बिग बी खूपच भावुक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी सोशल  मीडियावर त्यांच्या स्पेशल लाडक्या कुत्र्याच्या जाण्याची एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यासोबत दोघांचा एक खास फोटोसुद्धा पोस्ट केला आहे  


अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची एकच चर्चा 
अमिताभ यांनी कुत्र्यासोबतचा गोड फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की,"आमचा एक गोड छोटा मित्र...आमचा छोटा मित्र, हा मोठा झाला आणि आम्हाला सोडून गेला," अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



आणखी वाचा : Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips


युजर्स देताहेत अमिताभ बच्चन यांना धीर 
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केल्यानंतर युजर्स त्यांना धीर देत अनेक कॉमेंट्स करत आहेत. सध्या सगळीकडे अमिताभ बच्चन यांच्या याच पोस्टची खूप चर्चा आहे.