IND vs ENG सेमीफायनल पावसामुळे रद्द झाली तर? जाणून घ्या काय असेल निकाल

IND vs ENG SemiFinal : टी20 वर्ल्ड कप 2024 चं सेमीफायनल चित्र स्पष्ट झालं आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजदरम्यान रंगणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहे.

| Jun 25, 2024, 21:00 PM IST
1/6

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सेमीफायनलचे चार संघ निश्चित झाले आहेत. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलमधल्या चौथ्या चागेवर आपला दावा ठोकला. तर अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला मायदेशी परतावं लागलं.

2/6

आता सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि अफगाणिस्तान या चार संघांची वर्णी लागली आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड एकमेकांना भिडतील. दोन्ही सेमीफायनल एकाच दिवशी म्हणजे 27 जूनला रंगणार आहे. 

3/6

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यानचा सामना त्रिनिदादला रंगणार आहे. हा सामना सकाळी 5.30 वाजता खेळवला जाईल. तर भारत आणि इंग्लंडदरम्यानचा सेमीफायनल सामना वेस्टइंडिजच्या गयानामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता रंगेल.

4/6

पण दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सर्वात मोठी समस्या आहे ते इथलं हवामान. गयानात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे. याशिवाय अधूनमधून वादळी वारेही वाहत आहेत.

5/6

भारत आणि इंग्लंडचा सामना 27 जूनला होणार आहे. या दिवशी 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये केवळ एक दिवसाचं अंतर आहे. 

6/6

भारत आणि इंग्लंड सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आला तर 250 अतिरिक्त मिनिटांची सुट देण्यात आली आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. तर मात्र दुसऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल. म्हणजे सुपर-8 मध्ये ग्रुप टॉपला असणारा संघ फायनलमध्ये पोहोचेल. ग्रुप-2 मध्ये भारत टॉपवर आहे. म्हणजे पावसामुळे सेमीफायनल रद्द झाला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.