शिळ्या चपात्या खाण्याचेही आहेत आरोग्यदायी फायदे; रोज सकाळी नाश्यात आवर्जून खा!

रात्री केलेल्या चपात्या उरतात मग अनेकजण या शिळ्या चपात्या कावळ्याला घालतात किंवा मग गाईला देतात. पण तुम्हाला माहितीये का शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

| Jun 25, 2024, 19:08 PM IST

रात्री केलेल्या चपात्या उरतात मग अनेकजण या शिळ्या चपात्या कावळ्याला घालतात किंवा मग गाईला देतात. पण तुम्हाला माहितीये का शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

1/7

शिळ्या चपात्या खाण्याचेही आहेत आरोग्यदायी फायदे; रोज सकाळी नाश्यात आवर्जून खा!

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

शिळी चपातीखाणे आरोग्यासाठीही फायदेशीर असते. कारण ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती पचायला हलकी आणि सोपी असते. शिळ्या चपात्यामुळं पचनक्रिया सोपी होते. 

2/7

फायबर

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

शिळ्या चपातीमध्ये फायबरचा स्त्रोत मिळतो. फायबर हे नेहमीच पोटातील भूक शमवण्यासाठी उत्तम ठरते. शिळी चपाती खाल्ल्याने पोट लवकर भरते त्यामुळं भूकही अधिक लागत नाही.

3/7

कॅलरीचे प्रमाण कमी

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

शिळ्या चपातीमध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असते. वजन वाढण्याचा धोका नसतो. 

4/7

साखर नियंत्रणात राहते

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

शिळ्या चपातीमुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी शिळी चपाती खाणे योग्य ठरते. 

5/7

पोटाशी संबंधित आजार

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर शिळी चपाती गुणकारी आहे. बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, पोटात जळजळ आणि पोटाशी संबंधित आरोग्यावर शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे

6/7

रक्तदाब

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

 तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर शिळी चपाती खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो

7/7

Disclaimer

health tips in marathi Are stale rotis healthier than fresh ones

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)