मुंबई : रॅपर फ्रॅडरिक थॉम (Frederick Thomas) ज्याला फ्रेड द गोडसन (Fred the Godson) नावाने देखील ओळखलं जायचं. त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी या रॅपरचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेडलाइन डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मृत्यूची बातमी त्याचा मित्र डीजे सेल्फने दिली. ६ एप्रिल रोजी द ब्रॉक्स रॅपरने आपला फोटो पोस्ट केला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 



त्याला अस्थमा असून कोविड-१९ ची लागण झाली होती. यामुळे त्याच्या किडनीवर परिणाम झाला. त्याने शेअर केलेल्या फोटोत मुठ बंद करून ठेवली आहे. त्याने इंस्ट्राग्रामच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, मी या कोविड-१९ सोबत इथे आहे. कृपया मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. 



त्याची पत्नी लीअन जेम्मोटने ८ एप्रिल रोजी ब्रुकलिनच्या न्यूज १२ ला सांगितलं होतं की, थॉमसच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. आता त्याला पूर्णवेळ व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही. मात्र गुरूवारी थॉमसच्या एका प्रतिनिधीने त्याचं गुरूवारी निधन झाल्याचं सांगितलं. 


सोशल मीडियावर थॉमस प्रती शोक व्यक्त करण्यात आला. डीजे सेल्फने लिहिलं की, त्याच्याबद्दल एकही वाईट गोष्ट मी कधी ऐकली नाही. रेस्ट इन पीस मेरे भाई. सोशल मीडियावर त्याला आदरांजली वाहण्यात आली.