मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचा सोहळा अद्याप संपलेला नाही. इटलीत 2 दिवसांच लग्न पार पडल्यानंतर भारतात 2 रिसेप्शननंतर आता 2 पार्टी बाकी आहेत. 28 नोव्हेबंर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये दीपवीर शानदार पार्टी देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर यांनी कतरिना कैफला देखील आमंत्रण दिलं आहे. दीपिका आणि कतरिनाच्या कोल्ड वॉरबद्दल अनेकांना माहित आहे. जेव्हा दीपिकाने रणबीर कपूरसोबत ब्रेकअप केलं तेव्हा कतरिना त्याच्या आयुष्यात आली होती. 


यानंतर कतरिना आणि दीपिकामध्ये कॅट फाइट सुरू झाली. त्यानंतर या दोघी कधीच एकमेकींच्यासमोर आल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने आता कतरिनाला रिसेप्शनला बोलावलं आहे. कतरिना कैफला अगदी चार दिवस अगोदरच याच आमंत्रण देण्यात आलं आहे. 


एवढंच नाही तर कतरिना या पार्टीला येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तिने सलमान खानशी या संबंधित चर्चा देखील केल्याचं समजत आहे. जर सगळं ठीक असेल तर कतरिना कैफ सलमानसोबत या पार्टीत हजर राहिल. तसेच कतरिनाला रणवीर सिंहकडून देखील आमंत्रण पाठवलं आहे. रणवीर आणि दीपिका फिल्म इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांना पर्सनल मॅसेज पाठवत आहे. लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर दीपवीरला कतरिनाने शुभेच्छा दिल्या होत्या.