मुंबई : राजीव मसंद कायमच आपल्या मुलाखतीतून काही ना काही सरप्राईज ओपन करत असतात. अशीच एक गोष्टी राजीव मसंद यांच्या मुलाखतीतून प्रेक्षकांसमोर आली आहे. आपल्याला माहितच आहे प्रत्येक कलाकाराचा एक भूतकाळ असतो. खूप कठीण अशा परिस्थितीवर मात करत हे कलाकार बॉलिवूडमध्ये सुपरस्टार झालेले असतात. रविना टंडनने एकेकाळी हाकलून दिलेला मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविना टंडनने एका १२ वर्षाच्या मुलाला सेटवरून हाकलून दिलं होतं. कारण शुटिंगच्या दरम्यान हा मुलगा चित्रविचित्र हावभाव करून रविना टंडनचं लक्ष विचलित करत होता. तेव्हा तिने त्या मुलाला शुटिंगवरून हाकलून दिलं होतं. तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा सुपरस्टार, ज्याने खिलजीची भूमिका साकारून सगळ्यांनाच अचंबित केलं तो रणबीर सिंह. रणबीर सिंहने स्वतः ९० च्या दशकातील ही आठवण शेअर केली आहे. 


रणबीर सिंह म्हणाला की, अक्षय कुमार आणि रवीना टंडन तेव्हा एका सिनेमाचं शुटिंग करत होते. एका गाण्याच्या शुटिंग दरम्यान रवीनाने सफेद रंगाची साडी नेसली होती. आणि तेव्हा रवीनाची ती अदा पाहून रणबीर स्तब्ध झाला होता. रणबीरचे ते हावभाव बघून रवीनाला ते खूप वेगळं वाटलं आणि तिला रणबीरला सेटवरून हाकलून दिलं. रणवीरला लहानपणापासूनच सिनेमांत येण्याचा छंद होता. त्यासाठी तो नेहमी शुटिंग बघण्यासाठी जायचा आणि त्याचवेळी हा प्रसंग घडला. 


रणबीर हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. पद्मावत आणि बाजीराव मस्तानी या सारख्या सिनेमातील त्याचा अभिनय हा वाखाण्याजोगा होता. रणबीरने २०१० मध्ये 'बॅण्ड बाजा बारात' या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आज तो यशस्वी अभिनेता आहे.