मुंबई : लवकरच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला एक वर्ष होणार आहे. या दोघांनी गेल्यावर्षी 11 डिसेंबर रोजी इटलीच्या टसकनी शहरात लग्न केलं. हा सिनेमा त्यावर्षातील सर्वात महागडा सिनेमा आहे. या दोघांनी आपल्या लग्नाच्या कपड्यांवर तसेच वेन्यूवर करोडो रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर विरूष्काने मुंबईत रिसेप्शन केलं. ज्यामध्ये बॉलिवूड, क्रिकेट आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. आज विराट कोहली त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं की, त्याचं लग्न एक असं लग्न असावं जे प्रत्येकाने पाहावं. विरूष्काचं लग्न असं झालं की, त्या लग्नाची चर्चा आजही होताना दिसते. सुरूवातीला हे लग्न भारतात होणार असं म्हटलं जातं होतं पण हे लग्न अगदी साता समुद्रापार इटलीतील टसकनी शहरात झालं. 


विरूष्काच्या लग्नामुळे इटलीतील ती जागा अतिशय चर्चेत आली. कारण या अगोदर या ठिकाणी 2017 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांवर गेले होते. चारही बाजूंना असलेल्या डोंगरात वसलेल्या या फिनोशीटो रिजॉर्टमध्ये विरूष्काने भारतीय पद्धतीने सात फेरे घेतले. ज्या रिसॉर्टमध्ये या दोघांनी लग्न केलं ते ठिकाण आता सर्वात महागड्या रिसॉर्टमधील एक आहे. 


फोर्ब्स मॅगझीनच्या माहितीनुसार ख्रिसमस आणि न्यू ईअरला या रिसॉर्टची किंमत फार वाढते. एका आठवड्याकरता एका रूमची किंमत 94,83,210 रुपये आहे. म्हणजे एक रात्र रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जवळपास 12,54,744 रुपये मोजावे लागणार आहेत. 


रिपोर्टनुसार फिनोशीटो रिसॉर्ट ज्या जागेवर आहे ती जागा म्हणजे 800 वर्षे जुनं एक गाव आहे. ही जागा अतिशय सुंदर असून एअरपोर्टवरून रिसॉर्टला जाण्याकरता एक तास लागतो. या रिसॉर्टमध्ये ओवल शेप स्विमिंग पूल आहे.