मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या रिसेप्शनमध्ये अनेक बी टाऊनचे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी संगीत जगतातील एक व्यक्ती जी खूप दिवसांपासून या बॉलिवूडपासून लांब आहे त्या व्यक्तीने देखील हजेरी लावली होती. पण या व्यक्तीला आता ओळखणं अगदी कठीण झालं होतं. आपल्या आवाजाप्रमाणेच पर्सनॅलिटीने ओळखला जाणारा हनी सिंह अगदी वेगळाच दिसत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आपला लाडका गायक यो यो हनी सिंहला ओळखणं अतिशय कठिण झालं आहे. भरपूर वजन वाढल्यामुळे हनी सिंह वेगळा दिसत आहे. दीपवीरच्या रिसेप्शनला हनी सिंह ड्रेस कोडप्रमाणे काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला. यावेळी खूप वजन वाढलेल्या हनी सिंहने रणवीर सिंहसोबत अनेक रॅप देखील गायले. 


आपल्याला माहितच आहे की, दीपिका आणि रणवीर सिंह यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्याने दीपिकाच्या 'कॉकटेल' सिनेमातील लोकप्रिय पार्टी साँग 'अंग्रेजी बीट' देखील गायलं आहे. तसेच चेन्नई एक्सप्रेसमधील सुपरहिट गाणं 'लुंगी डान्स' हे गाणं देखील त्यानेच गायलं आहे. 




डिप्रेशनचा शिकार हनी सिंह


हनी सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. एका मुलाखतीत स्वतः हनी सिंहने सांगितलं की, 18 महिन्यांपर्यंत माझं जीवन अतिशय खराब होतं. या दरम्यान मी पूर्ण वेळ नॉएडाच्या घरी राहत असे. या दरम्यान हनी सिंह बायपोलर डिसऑर्डरचा शिकार होता. तसेच त्याने हे देखील मान्य केलं आहे की, तो बायपोलर होण्याबरोबर व्यसनाच्या आधीन देखील गेला होता. ज्यामुळे त्याला आणखी त्रास झाला. त्यामुळे खूप दिवसांनी कॅमेऱ्यासमोर बघितल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की तो कोणत्या प्रसंगातून गेला आहे.