`शोले`च्या climax scene दरम्यान बीग बींसोबत घडलेली भयंकर घटना, आजही `ती` आठवण ताजी
Sholay Climax Scene: `शोले` या चित्रपटाला आज 45 वर्षे पुर्ण होत आहे. या चित्रपटातील जय वीरूची जोडी आपण कधीच विसरू शकत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला एक दुर्देवी घटना घडली होती.
Sholay Climax Scene: 15 ऑगस्ट 1975 साली 'शोले' हा लोकप्रिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. हा चित्रपट संपुर्ण जगात लोकप्रिय आहे. त्यातून या चित्रपटाची अद्याप क्रेझ कमी झालेली नाही. आज 48 वर्षे होऊन गेली तरी या चित्रपटातील गाणी, या चित्रपटाचे संवाद आणि कथा प्रेक्षक हे विसरून शकलेले नाहीत. आजच्याच दिवशी 48 वर्षांपुर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळी या चित्रपटाच्या कथानकनं बॉलिवूडच्या सुवर्णकाळात ही वेगळीच किमया गाठली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा लक्षात आहे हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे त्यातून अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, सचिन पिळगांवकर, अमजद खान यांच्या भुमिकांनी चारचांद लावले होते. या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन हा आपल्या सर्वांचाच लाडका सीन आहे. परंतु तुम्हाला माहिती का की या चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनच्यावेळी एक दुर्घटना घडली होती ज्यातून अमिताभजी बचावले होते.
शोले हा चित्रपट आपण हजार वेळा पाहिला आहे. त्यातून या चित्रपटाच्या क्लामॅक्सच्या सीनला एक चूक झाली होती. ज्यातून अमिताभ बच्चन हे थोडक्यात वाचले होते. नक्की काय घडलं होतं? यावेळी 'कौन बनेगा करोडपती'त अमिताभ बच्चन यांनी याचा खुलासा केला होता. या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन शुट होत होता त्यावेळी खरोखरची बुलेट चालवण्यात आली होती. ज्यामुळे अमिताभ बच्चन हे थोडक्यात बचावले होते. हा किस्सा अमिताभ बच्चन यांनी आपणहून सांगितला होता. हा किस्सा ऐकून कदाचित तुमचेही हात थरथरायला लागतील.
या सीनबद्दल म्हणताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ''आम्ही क्लायमॅक्सचा सीन सूट करत होता. त्यावेळी धर्मेंद्र हे खाली उभे होते आणि मी वर उभा होता. धर्मेंद्रजी यांना लवकरात लवकरात सर्व दारू गोळा आणि बंदूकीच्या गोळ्या आपल्याकडे आणायच्या होत्या. पण ते गोळ्या उचलताना त्यांच्या हातून या गोळ्या खाली पडत होत्या. त्यामुळे सारखा सारखा रिटेक होत होता. त्यामुळे धर्मेंद्र हे खूप वैतागले होते.
यावेळी त्यांना एवढा राग आला होता की त्यांनी गोळ्या उचलल्या आणि बंदूकीत टाकल्या. त्या खऱ्या गोळ्या होत्या. त्याच रागात त्यांना त्या बंदुकीतून गोळी सोडली. तेवढ्यात मी वर उंचावर उभा होतो, एक गोळी माझ्या कानांना स्पर्श करून गेली. मी थोडक्यात बचावलो होतो.'', असं ते म्हणाले होते.