Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत?

Gauri Sawant Reaction on Taali: आज सुष्मिता सेन हिची 'ताली' हा सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. हा चित्रपट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. समलैंगी, ट्रान्सजेंडर समुदायाचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. आजही त्यांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो. गौरी सावंत यांचा संघर्ष मांडणारा त्यांचा जीवनपट जगासमोर आला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 15, 2023, 06:27 PM IST
Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत? title=
August 15, 2023 | gauri sawant reacts on taai film she says that what the transgender parents must have felt

Taali Reaction Gauri Sawant: 'ताली' हा बहुचर्चित वेबसिरिज आज प्रदर्शित झाला असून या वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ट्रान्सजेंडर आणि त्यांचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. त्यातून त्यांना अनेक विविध आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातील पहिला गोष्ट आणि सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची साथ. आपले आईवडिल आपल्यासोबत असतील तर आपली अर्धी लढाई ही तिथेच पुर्ण झालेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'ताली' या वेबसिरिजची. या वेबसिरिजमधून गौरी सावंत यांचा जीवन संघर्ष प्रेक्षकांसमोर आला आहे. सुष्मिता सेननं ही भुमिका निभावली आहे. सुष्मिता सेनच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. आपलं आयुष्य हे गौरी लावंत यांच्यासाठी नक्कीच सोप्पं नव्हतं परंतु ध्यास असेल आणि जिद्द त्यातूनही आत्मविश्वास असेल तर आपण कुठलीही लढाई ही नक्कीच पुर्ण करू शकतो. गौरी सावंत हे त्यातीलच एक सकारात्मक उदाहरण आहे. 

आज ही वेबसिरिज सर्वत्र प्रदर्शित झाली आहे. सहा एपिसोडच्या या सिरिजमध्ये गौरी सावंत यांचा संघर्ष आणि त्यांनी आपल्या आयुष्यात मिळवलेले यश आणि अनेकांनी दिलेला आधार आणि अनेकांचे त्यांनी आयुष्य कसे सकारात्मकतेनं बदलेले याचे दर्शन घडते. त्यांनी आपल्या जीवनावरील ही वेबसिरिज पाहिली आहे ज्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून त्यांचा आणि सुष्मिता सेनचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्या दोघीही फार आनंदी दिसत आहेत.

'ताली' पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

या पोस्टमध्ये गौरी सावंत म्हणाल्या की, ''आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होते. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल..... होणारी घुसमट, त्रास याला न्याय दिला आहे सुश्मिताने... क्षितिज काय लिहिलंय रे बाबा... रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते... सरळ सोप्या पद्धतीने माझे आयुष्य दाखवल्याबद्दल... अफिफा नडीयादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणलं.. कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार...''

हेही वाचा : ''...त्यांचा गैरफायदा घेणारे लोक'' पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

कोण आहेत गौरी सावंत? काय आहे त्यांचा संघर्ष? 

तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत आहेत. त्यांच्यासाठी त्या मोठ्या स्तरावर काम करत आहेत. त्यांचे खरे नावं हे गणेश नंदन होते. त्यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला होता. त्या ट्रान्सजेंडर आहे हे कळताच त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले होते आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर त्या हमसफर ट्र्स्टपर्यंत पोहचल्या आणि मग त्यांनी आपली ओळख बनवायला सुरूवात केली. तिथेच त्या गौरी सावंत झाल्या. त्यांनी एका मुलीलाही दत्तक घेतले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ताली' या वेबसिरिजमध्ये हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, अभिनेता सुव्रत जोशी, नंदु माधव यांच्या भुमिका आहेत. या सिरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून लेखक क्षितिज पटवर्धननं केलं आहे.