मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावली होती. तेव्हा चित्रीकरण  थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कलाविश्वावाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहेत. चित्रीकरण बंद झाल्यामुळे अनेकाचं काम सुटलं आहे. अनेक जण मुंबईसोडून हैदराबात, गुजरात, राजस्थान याठिकाणी  गेले आहेत. कलाविश्वाची परिस्थिती पाहाता The Federation of Western India Cine Employees (FWICE)ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FWICEने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात FWICEने शूटिंगसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. पत्रात  एफडब्ल्यूईसीचे अध्यक्ष बीएन तिवारी, सरचिटणीस अशोक दुबे, कोषाध्यक्ष गंगेश्वर श्रीवास्तव, मुख्य सल्लागार अशोक पंडित आणि मुख्य सल्लागार शरद शेलार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


एफडब्ल्यूईसीने सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून लाखो कलाकार, मजुर आणि तंत्रज्ञ बेरोजगार आहेत आणि चित्रपट उद्योग हा त्यांच्या कमाईचा एकमेव स्रोत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचं आयुष्य प्रभावित झालं आहे. आता लॉकडाऊन पुन्हा  15 दिवसांसाठी वाढवल्यामुळे कलाविश्वातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. 


पुढे पत्रत लिहिलं आहे की, '15 दिवसांसाठी पुन्हा लॉकडाऊन वाढल्यामुळे कलाकार, मजुर आणि तंत्रज्ञ यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय इंडस्ट्रीची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे.'  एकंदर परिस्थिती पाहाता शूटिंग सुरू करण्यासाठी  परवानगी लवकरात-लवकर द्यावी अशी मागणी FWICEने केली आहे. यासह, FWICEने आश्वासन दिले आहे की ते कामाच्या वेळी कोरोना रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करतील.