मुंबई : सलमान खान अभिनीत 'राधे'च्या चित्रिकरणाला २ ऑक्टोबरपासून कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये पुन्हा सुरूवात  होणार असून या १५ दिवसांच्या चित्रिकरणानंतर पॅचवर्कसाठी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये अंतिम चित्रीकरण पार पडेल. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे तंतोतंत पालन करण्याबरोबरच टीम कलाकार आणि क्रू मेम्बर्सच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी देखील घेतली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे चित्रीकरण मुंबई बाहेरील भागात होणार असून नेहमीचा प्रवास टाळण्यासाठी प्रॉडक्शन टीमने स्टुडिओ जवळील हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. उच्च पातळीची सुरक्षा राखत असताना चित्रीकरण काळात कोणत्याही सदस्याला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी असणार नाही.


प्रोडक्शनच्या जवळील सूत्रांनी सांगितले की, “संपूर्ण क्रू ची प्राथमिक कोविड 19 टेस्ट करण्यात आली असून कोणाचेही रिजल्ट पॉजिटिव आलेले नाहीत. दूसरे परीक्षण सेटच्या जवळच्या लोकांवर करण्यात येणार आहे ज्यामध्ये, अभिनेता आणि कोर टीम असेल. शेवटच्या क्षणातील गोंधळापासून वाचण्यासाठी एका विशेष व्हिडीओच्या माध्यमातून सेटवर पाळण्यात येणाऱ्या खबरदाऱ्यांबाबत सगळ्यांना माहिती देण्यात येणार आहे. सलमान खान सेटवर पूर्ण सावधगिरी बाळगण्याबाबत आग्रही आहे. त्याच्या सल्ल्यानुसार, सेटवर एक डॉक्टर आणि एक विशेष टीम असणार आहे."


सोहेल खान, सलमान खानचा भाऊ  आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती करत आहे, तो म्हणाला की, “आम्हाला आनंद आहे की राधेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत आहे. आम्ही एका एयर बबलची निर्मिती करत असून परिवहनच्या सर्व साधनांना नियमितपणे सेनिटाइझ करण्यात येईल."



सलमान आणि लीडिंग लेडी, दिशा पटानी व्यतिरिक्त, प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत असून जॅकी श्रॉफ एक खास व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत, जे  चित्रीकरणाच्या शेवटच्या भागात टीममध्ये सहभागी होतील.