Stree 2 : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. आज अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'Stree 2' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रात्री 9.30 वाजता हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला मोठ्या प्रमाणात मानधन देखील मिळाले आहे. मात्र, अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'Stree 2' पेक्षाही जास्त मानधन हे 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटासाठी घेतले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने 'स्त्री 2' या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर देखील दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरने 7 कोटी रुपये मानधन घेतले होते. रणबीर कपूरसोबतची तिची जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. याच चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 


सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री


बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश होतो. श्रदा कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते. फोटो शेअर करत ती नेहमी चाहत्यांना प्रश्न देखील विचारत असते. 



'स्त्री 2' आज प्रदर्शित होणार 


अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट आज रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा तिच्या चित्रपटाचे पोस्ट देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दिसत आहे. 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. तो चित्रपट खूप हिट ठरला. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी दिसले होते. 'स्त्री 2' मध्ये देखील हेच कलाकार दिसणार आहेत.